Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझ्याकडे काय बघतोस, असे म्हणत तरूणाला मारहाण

अहमदनगर/प्रतिनिधी ः माझ्याकडे काय बघतो, असे म्हणून मजुरी काम करणार्‍या एका तरूणाला लाथाबुक्क्यांनी व फायटरने मारहाण करून जखमी केले. कादर मुसा शेख

आम्हाला काम द्या…नाहीतर आर्थिक मदत द्या ; विडी कामगारांची प्रशासनाकडे मागणी
जागतिक विकासासाठी गांधी विचारांची गरज – प्रा. डॉ. सलमान अली मिर्झा
कोपरगावात पहाट पाडवा भक्ती गीतांचा कार्यक्रम उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी ः माझ्याकडे काय बघतो, असे म्हणून मजुरी काम करणार्‍या एका तरूणाला लाथाबुक्क्यांनी व फायटरने मारहाण करून जखमी केले. कादर मुसा शेख (वय 34 रा. कोठला) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्याने तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चंदी ऊर्फ चंद्रकांत अशोक सातपुते (रा. घासगल्ली, कोठला) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री पावणे बारा वाजता कोठला भागात ही घटना घडली असून गुरूवारी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. कादर मुसा शेख हे त्यांच्या कोठला येथील घरासमोर उभे असताना त्यांच्या ओळखीचा चंदी ऊर्फ चंद्रकांत सातपुते तेथे आला व म्हणाला,‘माझ्याकडे काय बघतो’, त्यावेळी शेख त्याला म्हणाले,‘मी तुझ्याकडे पाहत नाही’. याचा राग आल्याने सातपुते याने शेख यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या हातातील फायटरने डाव्या डोळ्यावर मारून जखमी केले. जखमी शेख यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला असता सातपुते घटनास्थळावरून पसार झाला. शेख यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून सातपुते विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

COMMENTS