Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकलेली जमीन परत मिळवून दे म्हणून मध्यस्थास मारहाण

लातूर प्रतिनिधी - दहा वर्षांपूर्वी विकलेली जमीन मला परत द्यायला सांगा, म्हणून शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी शिवाजीन

अंबरनाथमध्ये एका तरुणाला भररस्त्यात मारहाण.
दोन विद्यार्थिनी कोचिंगमधून बाहेर पडताच रस्त्यावर भिडल्या
धक्कादायक ! विधवा लेकीला बापाकडून मारहाण.

लातूर प्रतिनिधी – दहा वर्षांपूर्वी विकलेली जमीन मला परत द्यायला सांगा, म्हणून शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संभाजी रामकिशन रेड्डी (रा. ममदापूर, ता. लातूर) यांना गोपाळ गोविंद लकडे (रा. लातूर) याने गावाकडील दहा वर्षांपूर्वी माने यांनी खरेदी केलेली जमीन मला परत द्यायला सांगा, तुम्ही व्यवहारात मध्यस्थी होता. माने हे तुमचे मित्र आहेत, असे म्हणून धक्काबुक्की करून, शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात देण्यात आली. या तक्रारीवरून गोपाळ लकडे याच्यावर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. चौगुले हे करीत आहेत.

COMMENTS