अवजड वाहने करतात नगरमध्ये वाहतूक कोंडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवजड वाहने करतात नगरमध्ये वाहतूक कोंडी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरामध्ये अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी असतानाही सर्रास ही वाहने शहरातून येतात. स्टेशन रोडवर सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या क

अहमदनगरमध्ये आज रमाई चळवळीचे साहित्य संमेलन
बीजमाता राहीबाई पोपेरे यांची अनोखी दिवाळी; बियाणेरुपी दिवा आणि आरास करून साजरी
नगर शहरात आशा टॉकीज चौकात खुलेआम अवैधरित्या शस्त्रांची विक्री

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरामध्ये अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी असतानाही सर्रास ही वाहने शहरातून येतात. स्टेशन रोडवर सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे आधीच शहराची वाहतूक विस्कळीत झालेली असताना अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीमुळे अधिकच भर पडत आहे. शहर राष्ट्रवादीने मध्यंतरी अवजड वाहने बंद करण्यासाठी आंदोलन केले होते तर छावा संघटनेनेही अवजड वाहने शहराबाहेरून नेण्याचे आवाहन केले होते. पण आंदोलने व मागण्या धुडकावून अवजड वाहने बिनधास्तपणे शहरातून जा-ये करीत असल्याने स्थानिक वाहतुकीला अडचणी होत आहेत व अपघातांची शक्यताही वाढली आहे.
नगर शहरामध्ये सध्या उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम सुरू असताना नगर शहरामध्ये अवजड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. पण तरी देखील त्या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तासनतास वाहतुकीचा खोळंबा होत आहे. विशेष म्हणजे रविवारीही तीन वेळेला वाहतूक समस्या निर्माण झाल्यामुळे अवजड वाहनांच्या संदर्भातला विषय चांगलाच ऐरणीवर आलेला आहे. नियम केले असताना त्याची अंमलबजावणी होत नाही त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. स्टेशन रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे झाले आहेत. त्यामुळे अवजड वाहने संथपणे जातात. परिणामी, त्यांना डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचे प्रकार स्थानिक वाहनचालकांकडून होत आहेत. यात रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना हॉटेल्स व कृषी साहित्य विक्रीची दुकाने असून, त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांची वाहनेही रस्त्यावरच पार्क केली जात असल्याने रस्त्याने जाणारे-येणारे कसरत करीत वाट काढीत गाडी दामटतात, पण त्यामुळे त्यांचे वाहन घसरून जीवघेणा अपघात होण्याची शक्यता आहे. नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे आतापर्यंत 83 हून अधिक पिलर उभारण्यात आलेले आहेत व त्यावर आता सिगमेंट बसवण्याचे काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. ज्या वेळेला उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, त्या वेळेला जिल्हा प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केला होता. त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुद्धा पोलीस विभागाला देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने नगर शहरातील अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू करण्यात आलेली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती थांबली असल्याने आता नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच अवजड वाहनेही शहरातून येत असल्याने स्टेशन रोडवर नेहमी वाहतूक कोंडी होते व यात स्थानिक वाहनेही जाम होतात. नगर शहरातील सक्करचौक ते कोठी परिसर आदी भागांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

अंमलबजावणीकडे कानाडोळा
अवजड वाहनांच्यामुळे याअगोदर स्टेशन रोडवर अपघात झालेले आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत तीन जणांचा बळी सुद्धा गेलेला आहे. मात्र, आजही सर्रासपणे अवजड वाहने नगर शहरातून जात आहेत. वास्तविक पाहता नगर-पुणे महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर हे काम चालू असल्यामुळे अवजड वाहतूक ही कोठी रोड तसेच बाह्यवळण मार्गाने वळवण्यात आली असतानादेखील सर्रासपणे दिवसभरामध्ये मोठे कंटेनर तसेच मोठ्या ट्रक स्टेशन रोडवरून जात असताना दिसून येत आहे. एकंदरीतच वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करून देखील म्हणावा असा उपयोग झालेला नाही असेच म्हणावे लागेल. अवजड वाहतूक शहरात येणार नाही, याची दक्षता घेण्याचे व तशी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे मात्र वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे.

COMMENTS