उद्यापर्यंत कामावर हजर व्हा, अन्यथा मेस्मा अंतर्गत कारवाई : परिवहनमंत्री परब यांचा अल्टीमेटम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्यापर्यंत कामावर हजर व्हा, अन्यथा मेस्मा अंतर्गत कारवाई : परिवहनमंत्री परब यांचा अल्टीमेटम

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप काही संपण्यांची चिन्हे नाहीत. राज्यातील काही डेपोमध्ये कर्मचारी कामावर हजर झाले अ

आजोबासह तीन वर्षाच्या नातवाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
तुफान राडा ! इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीत दोन फॅन्समध्ये जोरदार हाणामारी | LokNews24
Beed : गेवराईत दोन दुकानांना आग लागून लाखोंचे नुकसान

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप काही संपण्यांची चिन्हे नाहीत. राज्यातील काही डेपोमध्ये कर्मचारी कामावर हजर झाले असले तरी, काही कर्मचारी अद्यापही कामांवर हजर झालेले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांना शेवटचा अल्टीमेटम दिला असून, कर्मचार्‍यांनी सोमवारपर्यंत कामावर हजर झाले नाही, तर कठोर निर्णय घेण्याचे संकेत परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिले आहेत.
सोमवारनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. आधी निलंबन, त्यानंतर त्याची चौकशी होईल. त्यानंतर प्रशासन ठरवतं की त्याला बडतर्फ केलं जाईल की सेवेत घेतलं जाईल. माणुसकीच्या दृष्टीने अजून एक संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. यानंतरही कामगार आले नाहीत, तर त्यानंतर मेस्मा किंवा इतर कोणती कारवाई करायची, याविषयीचा निर्णय घेतला जाईल. सोमवारपर्यंत मेस्मा संदर्भात कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे अनिल परब म्हणाले. कामावर न परतणार्‍या जवळपास 10 हजार कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, आता राज्य सरकारकडून कर्मचार्‍यांना शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यावेळी माध्यमांना संबोधित करतांना परब म्हणाले की, महाराष्ट्रातल्या सगळ्या डीसींशी बोललो. त्यांच्याकडे कर्मचारी जाऊन सांगतायत की आम्हाला कामावर यायचंय पण काही लोकांकडून कामावर येऊ दिलं जात नाहीये. काही सांगतायत, आम्ही निलंबित आहोत म्हणून कामावर जाता येत नाहीये. त्यामुळे सगळ्या अधिकार्‍यांचे असे म्हणणे आहे की एक संधी दिली पाहिजे, असे अनिल परब यांनी सांगितले. आम्ही निर्णय घेतलाय, की जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील, त्यांचे निलंबन मागे घेऊ. जिथे डेपो 50 टक्क्यांपेक्षा जास्त चालू होईल, त्यांना त्याच डेपोमध्ये काम दिले जाईल. पण जिथे तेवढी कामगार संख्या नाही होणार, त्यांना आजूबाजूच्या डेपोमध्ये सामावून घेतले जाईल, असे अनिल परब म्हणाले.

COMMENTS