Homeताज्या बातम्यादेश

अयोध्येतील श्रीराम मंदिरात नमाज पठणाचा प्रयत्न

तीन जणांना घेतले ताब्यात, सुरक्षा यंत्रणा सतर्कअयोध्या : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी संकुलात शनिवारी सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे काही काळ तणावाचे व

प्रा. साईबाबांसह पाच जणांची निर्दोष मुक्तता
राहुरी कृषी बाजार समिती होणार डिजिटल ः अरूण तनपुरे
लातूर पोलीस दलात अत्याधुनिक 15 चारचाकी वाहने दाखल

तीन जणांना घेतले ताब्यात, सुरक्षा यंत्रणा सतर्क
अयोध्या : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी संकुलात शनिवारी सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मंदिर परिसरात प्रवेश केलेल्या तीन जणांनी नमाज पठणाचा प्रयत्न केल्याचा संशयास्पद प्रयत्न समोर आला आहे. याप्रकरणी दोन तरुण आणि एका तरुणीला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेनंतर संकुलातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे तिघे राम मंदिराच्या डी-1 प्रवेशद्वारातून संकुलात दाखल झाले होते. मंदिरात प्रवेशासाठी नियमित सुरक्षा तपासणी केली जाते; मात्र ओळखपत्रांची सक्ती नसल्याचा फायदा घेत त्यांनी परिसरात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. संकुलात प्रवेश केल्यानंतर ते मुख्य मंदिरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या सीता रसोई परिसरात पोहोचले. तेथे धार्मिक विधी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सुरक्षा कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच त्यांना थांबवण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा कर्मचार्‍यांनी अडविल्यानंतर संबंधित व्यक्तींनी काही काळ घोषणाबाजी केल्याचेही सांगितले जाते. मात्र, सुरक्षा दलाने परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींनी आपण काश्मीरचे रहिवासी असल्याची माहिती दिली आहे. त्यापैकी एका तरुणाचे नाव अबू अहमद शेख असून तो काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. एका तरुणीचे नाव सोफिया असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर तिसर्‍या तरुणाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. या तिघांची पार्श्‍वभूमी, अयोध्येत येण्यामागील नेमका उद्देश आणि त्यांच्या हालचालींचा तपशील जाणून घेण्यासाठी पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, गुप्तचर विभाग तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या या प्रकरणावर जिल्हा प्रशासनाकडून किंवा श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था
22 जानेवारी 2024 रोजी भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिरात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज सुमारे दीड लाख भाविक दर्शनासाठी अयोध्येत दाखल होत असल्याने परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मंदिर आणि संकुलाची सुरक्षा स्पेशल सिक्युरिटी फोर्स (एसएसएफ)कडे असून सुमारे 200 हून अधिक प्रशिक्षित कर्मचारी येथे तैनात आहेत.

COMMENTS