Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलीला बोलल्याच्या रागातून वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला

मुलीच्या आईसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

संगमनेर प्रतिनिधी - मुलीला बोलल्याच्या कारणावरून आईसह नातेवाईकांनी शिवीगाळ लाथाबुक्क्याने मारहाण करत कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात वडील गंभीर जखमी

कोपरगावच्या साई सालकरची उत्तुंग भरारी
मुग्धाची कविता’ हे बाल साहित्यातील आश्वासक पाऊल – प्रा.दासू वैद्य.
कलाकार प्रमोद पंडित यांचा नरहरी सेनेच्या वतीने सत्कार

संगमनेर प्रतिनिधी – मुलीला बोलल्याच्या कारणावरून आईसह नातेवाईकांनी शिवीगाळ लाथाबुक्क्याने मारहाण करत कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथे घडला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईसह चार जणांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमसेन माधव रुपवते (वय २८ वर्ष, धंदा मजुरी रा. समनापुर, ता. संगमनेर, ह. रा. पोखरी हवेली, संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश विलास सोनवणे, संतोष संपत साळवे, सविता विलास सोनवणे, सोनल भीमसेन रुपवते (सर्व रा. पोखरी हवेली, ता. संगमनेर) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमसेन रुपवते हे काही कारणावरून मुलीला बोलले होते. त्यामुळे आईसह वरील आरोपींनी सोमवारी (दि. १५ मे) रात्री साडेअकरा वाजता रुपवते यांना शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारहाण केली. आरोपी महेश विलास सोनवणे याने हातातील कुऱ्हाडीने रुपवते यांच्या डोक्यात डाव्या बाजूला मारत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच तुला आज जिवंत सोडणार नाही असा दम दिला. या आशयाच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार विष्णू आहेर पुढील तपास करत आहेत.

COMMENTS