कपडे धुण्यासाठी गेलेली महिला ओढ्यात गेली वाहून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कपडे धुण्यासाठी गेलेली महिला ओढ्यात गेली वाहून

नेवासा फाटा , प्रतिनिधी नेवासा तालूक्यातील मुकिंदपूर एक येथील  २७ वर्षिय महिला नागझरी ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेली असता शनिवार (दि.२) रोजी सका

Ahmednagar : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची लोकमंथन कार्यालयास भेट (Video)
शाडू मातीच्या पर्यावरणपुरक श्रीगणेशाचे चौकात बनविलेल्या कुंडात विसर्जन
संकट काळात प्रामाणिक सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज – पद्मश्री पोपटराव पवार.

नेवासा फाटा , प्रतिनिधी

नेवासा तालूक्यातील मुकिंदपूर एक येथील  २७ वर्षिय महिला नागझरी ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेली असता शनिवार (दि.२) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पाण्यात वाहून गेली आहे या महिलेच़्या  बचावा कार्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु असून प्रशासनाला ‘तीचा’ शोध घेण्यास अपयश येत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,मुकिंदपूर हद्दीतून जात असलेला नागझरी ओढा आहे या ओढ्यात सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रोहिनी रमेश घुगे वय (२७) ही महीला कपडे धुण्यासाठी ओढ्याकडे आली असता ती या पाण्यात पडून वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या महिलेचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध कार्य सुरु असून सकाळी १०:३० वाजता नागझरी ओढ्यात वाहून गेलेल्या महिलाचा सांयकाळी पाच वाजेपर्यंतही शोध लागला नसल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या आठवड्यापासून पाऊसाने जोरदार हजेरी लावलेल्यामुळे ओढे – नाले तुडूंब वाहू लागले असून प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सर्ततेचा इशारा देण्यात आलेला असून नागरिकांनी गाफील न राहण्याच्या सुचनाही नदीकाठच्या हद्दीत प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

COMMENTS