देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ःजमिनीच्या कारणावरुन तूम्हाला येथे राहू देणार नाही. असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून एका महिलेला लाथा बूक्क्यांनी मारहाण
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ःजमिनीच्या कारणावरुन तूम्हाला येथे राहू देणार नाही. असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून एका महिलेला लाथा बूक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालूक्यातील वरशिंदे येथे 12 मे रोजी घडली. सदर महिला मागासवर्गीय समाजातील असल्याने वरशिंदे येथील उप सरपंचावर ट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चंद्रभागा भाऊसाहेब कदम या मागासवर्गीय समाजातील असून त्या राहुरी तालूक्यातील वरशिंदे येथील लांघेवस्ती येथे राहत आहेत. त्या ठिकाणी त्यांची सासू सुलाबाई गटुजी कदम यांच्या नावावर जमिन आहे. सदर मिळकतच्या उतारावर खाडाखोड करुन ग्रामपंचयात वरशिंदे हे नाव लागले. तेव्हा कदम यांनी गावचे उपसरपंच दिपक रामनाथ वाबळे याला विचारले असता तो म्हणाला की, मी 28 दिवसात तुम्हाला त्याची माहीती देतो.12 मे रोजी सकाळी 9.30 वाजे दरम्यान चंद्रभागा कदम या दिपक रामनाथ वाबळे यांच्याकडे जात असताना तो वाबळेवाडी जवळील कॉलेज जवळ भेटला. तेव्हा कदम यांनी त्याला विचारले कि, आमच्या जागेच्या बाबत 28 दिवसात दुरस्ती करणार होते. त्याचे काय झाले. तेव्हा तो आम्हाला म्हणाला की, सदर मिळकती बाबत मीच खाडा खोड केली आहे. त्या जमिनी मी ताब्यात घेवुन तुम्हा भिल्लाट्यांना येथे राहु देणार नाही. असे म्हणुन त्याने आम्हाला जाती वाचक शिवीगाळ करुन लाथा बुक्याने मारहाण केली. तसेच माझ्या नादी लागू नका, नाहीतर तुम्हा एका एकाला जे. सी. बी. ने खड्डे घेवुन त्यात गाडुन टाकीन. तुम्ही येथुन निघुन जा. नाहीतर मी माझ्या एका फोनवर 50 मुले गोळा करुन तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. घटनेनंतर चंद्रभागा भाऊसाहेब कदम यांनी भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल यांच्यासह राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरशिंदे येथील उप सरपंच आरोपी दिपक रामनाथ वाबळे रा. वाबळेवाडी वरशिंदे ता. राहुरी. याच्या विरुध्द गुन्हा रजि. नं. 506/2023 भादंवि कलम 323, 504, 506 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम नूसार गुन्हा दाखल करण्यात आला.
COMMENTS