Homeताज्या बातम्यामनोरंजन

60 व्या वर्षी गोविंदा पुन्हा अडकला लग्नबंधनात

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदाने सुनिता अहूजासोबत लग्नगाठ बांधली होती. त्याने त्याचं लग्न बऱ्याच काळापासून सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. अशातच

देशातील 1 टक्के श्रीमंताकडे 40 टक्के संपत्ती
दुर्देवी ! 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू |
दोन वर्षांपूर्वीच्या किरकोळ वादातुन एकाचा मृत्यू;पाथर्डी तालुक्यातील घटना

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदाने सुनिता अहूजासोबत लग्नगाठ बांधली होती. त्याने त्याचं लग्न बऱ्याच काळापासून सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. अशातच लोकं नेहमीच त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. लग्नाच्या अनेक वर्षानंतर गोविंदाने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. मात्र तुम्हाला गोंधळात पडायची काहीच गरज नाही. कारण अभिनेत्याने जरी पुन्हा एकदा लग्न केलं असलं तरिही त्याने त्याच्या पत्नीसोबतच पुन्हा एकदा लग्न केलं आहे. त्यामुळे हे सिद्ध झालं आहे की, त्यांच्या प्रेमळ नात्यात आजही तो गोडवा आहे. ‘डान्स दीवाने 4’च्या मंचावर गोविंदाने पत्नी सुनीतासोबत पुन्हा एकदा वरमाला सेरेमनी केली. हे तेव्हा झालं जेव्हा गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा फेमस रियलिटी शो ‘डान्स दीवाने सीझन 4’च्या सेटवर पोहचले होते. जजच्या खुर्चीत बसलेली माधुरी दीक्षितने डान्सर आणि एक्टर गोविंदासोबत तिचं गुपचूप लग्नाबाबत विचारलं. माधुरी ने पुढे विचारलं, ‘गोविंदा जी, तुमचं लग्न कधी आणि केव्हा झालं? काही समजलंच नाही’ यावर सुनिता म्हणाली, ‘आमच्या लग्नाचा एकही फोटो नाही’ यानंतर संधी न दवडता माधुरीने लगेजच या संवादात उडी घेतली आणि म्हणाली, ‘फोटो नसेल तर काय झालं, डान्स दीवाने हा वेड्यांचा परिवार आहे, आज आम्ही तुमचं पुन्हा लग्न लावू.’

COMMENTS