Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत पाडणार कृत्रिम पाऊस

प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकार घेणार निर्णय

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाने उच्च पातळी ओलांडली असल्यामुळे, आणि गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण कमी न झाल्यामुळे हवेच्या गुणवत्तेत

राहुरी तालुक्यात ऊस पिकावर हूमणी अळीचा प्रादूर्भाव
अनुष्का आणि विराट लवकरच सुरू करणार बँड.
घरकाम जमत नसल्याने सासूकडून सुनेचा खून

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाने उच्च पातळी ओलांडली असल्यामुळे, आणि गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण कमी न झाल्यामुळे हवेच्या गुणवत्तेत कोणतीही सुधारणा झालेली नाही. प्रदूषणाची पातळी धोकादायक स्थितीत असून विषारी हवेमुळे दिल्लीकरांचा श्‍वास गुदमरत आहे. यावरून दिल्ली न्यायालयाने फटकारल्यानंतर सरकार आता कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तयारीत आहे.
20 नोव्हेंबरदरम्यान एनसीआरमध्ये क्लाउड सीडिंगच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आयआयटी कानपूरच्या संशोधकांची एक बैठक बोलावली होती. आकाशात ढग आणि वातावरण दमट असते त्यावेळीच क्लाउड सीडिंगचा प्रयोग केला जाऊ शकतो, अशी माहिती संशोधकांनी यावेळी दिली. दरम्यान 20 आणि 21 नोव्हेंबर दरम्यान दिल्ली परिसरात अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी संशोधकांना दिली आहे. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती गोपाल राय यांनी दिली. भारतात याआधी वेगवेगळ्या राज्यांमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्यात आले आहेत. मात्र यातील बरेच प्रयोग हे दुष्काळाच्या परिस्थितीत करण्यात आलेले आहेत. प्रदूषणावरचा हा पहिलाच प्रयोग आहे. हवेत असलेले दूषित कण जमिनीवर आणण्यासाठी पाणी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो. मात्र यांचा परिणाम किती होईल याबाबत संशोधकांची वेगवेगळी मते आहेत.

COMMENTS