बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई : केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियान (एसएमएसपी) या योजनेतील बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी बाबतचा आढावा आज कृषिमंत्री दाद

दूध उत्पादनात भारताने पटकावला प्रथम क्रमांक
अतिवृष्टीमुळे बाधित शेतजमिन दुरुस्तीची कामे जिल्हा प्रशासनातर्फे सुरु : शेखर सिंह
शेतकर्यांसाठी कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व महाबीज यांनी एकत्र येवून काम करावे- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

मुंबई : केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियान (एसएमएसपी) या योजनेतील बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी बाबतचा आढावा आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला. या योजनेत चांगल्या पद्धतीने सुरु असलेल्या शेतकरी बियाणे उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गट, अन्नधान्य उत्पादक संघ आदींचा सहभाग घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप अभियान अंतर्गत असणारी बियाणे व प्रक्रिया साठवण केंद्र उभारणी ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. राज्यात या प्रकल्पासाठी 50 प्रकल्प उभारणीचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले होते. महत्त्वाच्या पिकांचे क्षेत्र लक्षात घेऊन लक्षांक निर्धारित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने एकूण 48 प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी 42 प्रस्ताव पात्र ठरले. उर्वरित पैकी चार रद्द तर दोन अपात्र ठरवण्यात आले. आजमितीस एकूण 16 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. याशिवाय, सन 2021-22 मध्ये एकूण 10 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. अधिकाधिक चांगल्या संस्था या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येतील, यासाठी जिल्हा स्तरावरील कृषी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश कृषीमंत्री श्री.भुसे त्यांनी दिले. मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीस कृषि विभागाचे सहसचिव गणेश पाटील, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) दिलीप झेंडे, उमेश चांदवडे उपस्थित होते.

COMMENTS