Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपूर्वा रोकडेची ज्युनियर कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी

राहुरी/प्रतिनीधी ः उत्तराखंड राज्यातील देहरादून येथे झालेल्या किओ ऑल इंडिया कॅडेट व ज्युनियर कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र संघाने चमकदार

वारीत दशावतारी आखाडीचे आयोजन
राहुरी तालुक्यात ऊस पिकावर हूमणी अळीचा प्रादूर्भाव
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून चौकशी

राहुरी/प्रतिनीधी ः उत्तराखंड राज्यातील देहरादून येथे झालेल्या किओ ऑल इंडिया कॅडेट व ज्युनियर कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी नोंदवत सांघिक विजेतेपद पटकावले. यश मिळवलेली अपूर्वा रोकडे ही मूळची राहुरी येथील रहिवासी असलेले  श्रीहर्ष दादासाहेब रोकडे (माजी सैनिक) यांची कन्या असून ती इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स फोर्ट मुंबई-12 येथे शिक्षण घेत आहे.
ऑल इंडिया कॅडेट (14-15 वर्षे), ज्युनियर (16-17 वर्षे) कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कराटे इंडिया ऑर्गनायजेशन’ या भारतातील वर्ल्ड कराटे फफेडरेशन मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीने परेड ग्राउंड, देहरादून, उत्तराखंड येथे 23 व 24 सप्टेंबर 2023 दरम्यान संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण 21 राज्यांतील एक हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण, 1 रौप्य व 3 कांस्य पदकांसह स्पर्धेचे सांघिक विजेतेपद  पटकाविले. महाराष्ट्राच्या 21 वर्षा आतील महिला संघाचे नेत्रदीपक कामगिरी करीत रजत पदकासह रुपये 25,000/- चे रोख पारितोषिक पटकाविले सदर स्पर्धेतील 21 वर्षा आतील उपविजेता महिला संघ 1) अपूर्वा रोकडे , 2) सांची पगारे, 3) पायल सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय कराटे जज व स्वतः आंतरराष्ट्रीय माजी खेळाडू असलेले तिचे प्रशिक्षक तसेच द युथ शोतोकाँन  कराटे अकॅडमी या संस्थेचे प्रशिक्षक शिहान अनुप देठे, यांच्या मार्गदर्शनाखाली (मुलुंड पश्‍चिम) मुंबई येथे अपूर्वा रोकडे प्रशिक्षण घेत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स च्या डायरेक्टर मा.श्रीमती प्रतिमा जाधव तसेच सर्व स्टाफ यांचेही मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू 6 ते 9 नोव्हेंबरदरम्यान आलमाटी, कझाकस्थान येथे होणार्‍या 21 व्या एशियन कॅडेट, ज्युनियर व 21 वर्षांखालील कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत, अशी माहिती राज्य सचिव संदीप गाडे यांनी दिली.मूळचे राहुरी येथील रहिवासी असलेले माजी सैनिक श्रीहर्ष दादासाहेब रोकडे  यांची कन्या असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सहादू रोकडे, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते शीलादेवी दादासाहेब रोकडे, आंबेडकर चळवळीतील यांची नात, तथागत दादासाहेब रोकडे यांची पुतणी असून विविध स्तरावर तिचे अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS