Homeताज्या बातम्यासंपादकीय

निवडणूक रणनीतीकारांचे एक वास्तव !

सध्या लोकसभा निवडणुका  वेग पकडू लागल्या आहेत. अशा वेळी निवडणूक रणनीतीकार ही भारतीयच नव्हे तर जगभरातील निवडणुकांमध्ये उपस्थित झालेली, एक नवी कॉर्प

हल्लेखोर दोषी, सूत्रधार निर्दोष !
सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय आणि टायमिंग ! 
विषमतेत वाढ दर्शविणारा अहवाल, चिंताजनक!

सध्या लोकसभा निवडणुका  वेग पकडू लागल्या आहेत. अशा वेळी निवडणूक रणनीतीकार ही भारतीयच नव्हे तर जगभरातील निवडणुकांमध्ये उपस्थित झालेली, एक नवी कॉर्पोरेट जमात  विकसित झाली आहे. महागडे पॅकेज घेऊन हे लोक निवडणुकांची स्ट्रॅटेजी बनवण्याचा दावा करतात. ज्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी बनवतात, त्यांना विजयी करण्याची तथाकथित हमी देतात. परंतु, त्यांच्या रणनीतीची शास्त्रीयता नेमकी काय आहे, याची पडताळणी अजूनही केली जात नाही! भारतात प्रशांत किशोर यांच्या निवडणूक रणनीती पासून प्रसार माध्यमात या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली. प्रशांत किशोर यांचे स्थान रणनीतीकार म्हणून नेमके काय आहे, यावर आम्ही बोलणार नाहीत; परंतु, आपल्या या क्षेत्राचा अतिरिक्त वापर ते करू लागले आहेत. स्वतःचा राजकीय पक्ष निर्माण करून त्यासाठी कार्य करण्याऐवजी, ते सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कुठून किती जागा घेतील, किती मत घेतील, याचा अंदाज व्यक्त करीत राहतात आणि वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखत देत बसतात. जर, तुम्ही निवडणूक रणनीतीकार म्हणून आपली भूमिका सोडली आहे, एका राजकीय पक्षाला तुम्ही चालवता आहेत, तर मग निवडणूक काळात तुम्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात कोण जिंकेल,

कोणाला जास्त जागा मिळतील, या प्रकारचे अंदाज व्यक्त करणाऱ्या मुलाखती का देत आहेत? हा भारतीय लोकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रश्न ठरतो आहे. तसे पाहिले तर भारतात निवडणूक रणनीतीकार म्हणून जर प्रथम कोणी काम केले असेल तर, ते नाव म्हणजे डॉ. योगेंद्र यादव. त्यांनी सांख्यिकी स्तरावर निवडणुकीचे अंदाज आणि निवडणुककांचे विश्लेषण, त्याचप्रमाणे विचारसरणी आणि निवडणुकीतील तात्विकता या सगळ्याच गोष्टींवर अगदी परखड सत्य मांडण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्यांचे विश्लेषण, निवडणूक अंदाज, सांख्यिकी आणि राजकारणातली विचारसरणी आणि त्यायोगे मतदारांची भूमिका, या सर्वच बाबतीत ते ज्या ज्या वेळी भाष्य करत, त्या त्या वेळी ते वस्तुस्थितीच्या जवळ जाणारे ठरत असे. त्यांच्या या वास्तवाकडे भारतीय प्रसारमध्यमांनी कायम दुर्लक्ष केले. परंतु, त्यांनी या दुर्लक्षाला विसरून आपल्या नव्या भूमिकेत प्रवेश केला आणि शेतकरी आंदोलन, त्याचप्रमाणे समाजवादी विचारक म्हणून नव्या पक्षाची निर्मिती, त्यात त्यांनी आपल्याला झोकून दिले. त्यांनी निवडणूक अंदाज, स्ट्रॅटेजी आदी सर्व गोष्टींचा अंदाज व्यक्त करणे सोडून दिले. परंतु, एक संविधानवादी म्हणून त्यांनी नेहमीच संविधानिक विचारसरणी आणि तत्व भारताच्या मध्यवर्ती सत्तेत असावे, अशी अपेक्षा कायम व्यक्त केली.  ते काँग्रेस सारख्या पक्षाशी मतभेद असूनही २०२४ च्या निवडणुकीत त्यांच्या सोबत आहेत; तर दुसऱ्या बाजूला भारतात निवडणूक रणनीतीकार म्हणून गाजणारे प्रशांत किशोर एका बाजूला निवडणूक स्टॅट्रेजिस्ट म्हणून आपण भूमिका सोडून दिल्याचे सांगतात आणि दुसऱ्या बाजूला ऐन निवडणुकीच्या काळात, प्रसार माध्यमांना मुलाखती देऊन विरोधी पक्ष किती जागा जिंकेल आणि सत्ताधारी पक्ष किती जागा जिंकेल याचा अंदाज व्यक्त करतात!  त्याचवेळी कोणत्या भागातून कोणाला जास्त जागा, कुणाला कमी जागा मिळतील, कोण सत्तेवर येईल, असा एक सत्ताधार्जींना अंदाज आणि आडाखा व्यक्त करत राहतात. या बाबीला खरे तर नैतिकदृष्ट्या मान्य करता येणार नाही! डॉ. योगेंद्र यादव आणि प्रशांत किशोर यांच्यामधला हा मूलभूत फरक, भारतीय समाजाने लक्षात घेतला पाहिजे. वास्तविक पाहता, मतदार हा स्वतंत्र विचार करतो. त्याचप्रमाणे राजकारणातील नेते हे जनतेशी अधिक जोडलेले असतात. त्यामुळे जनतेची मानसिकता, जनतेचे प्रश्न, जनतेची विचारसरणी आणि जनतेचे कार्य करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी राजकीय नेत्याला अधिक कळतात. कारण, ते जनतेशी जुळलेले असतात. याउलट, प्रशांत किशोर हे केवळ स्ट्रॅटेजी तयार करताना एक प्रकारचा कॅनवास तयार करतात; ज्या कॅनव्हास चा जनतेशी काहीही थेट संपर्क नसतो. अशावेळी जनतेशी थेट संपर्कात असणारे राजकीय नेते आणि पक्ष यांचे अंदाज खरे असणार की जनतेशी चुकूनही संपर्क न येणारे स्ट्रॅटेजिस्ट यांचे अंदाज खरे असणार, यावर चाणाक्ष जनतेने आणि मतदारांनी विचार करणे अधिक योग्य आहे.

COMMENTS