अंगणवाडी सेविकांच चटणी भाकर आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांच चटणी भाकर आंदोलन

सोलापूर प्रतिनिधी - सोलापुरात मागील तीन दिवसापासून अंगणवाडी सेविका जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन करत आहेत. अंगणवाडी सेविकांनी चटणी भाकर आंदोलन

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने शिंदे फडणवीस सरकार कायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे – चंद्रशेखर बावनकुळे 
आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात
मुलुंडमध्ये व्यवसायिक इमारतीला आग

सोलापूर प्रतिनिधी – सोलापुरात मागील तीन दिवसापासून अंगणवाडी सेविका जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन करत आहेत. अंगणवाडी सेविकांनी चटणी भाकर आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केला. मानधनात वाढ, पोषण ट्रॅकर मराठीत करणे, नवीन मोबाइल, ग्रॅच्युइटी लागू करणे, आहार आणि इंधनाचे दर वाढवणे आदी मागण्यांकडे राज्य सरकार दोन वर्षांपासून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांचा आहे. त्या निषेधार्थ राज्यभरातील दोन लाख अंगणवाडी सेविका तीन दिवसांपासून संपावर उतरले आहेत. सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालय येथे अंगणवाडी सेविका दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी थाळी नाद आंदोलन त्यानंतर लाटणे दाखवून आंदोलन करण्यात आले. चटणी भाकरी हातात घेऊन अनोखे आंदोलन केले. लोकांच्या मुलांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविका काम करत असतात. मात्र केवळ आठ हजार रुपयांच्या मानधनात घर चालवताना त्यांच्या स्वतःच्या मुलांवर कुपोषणाची वेळ आली आहे. या अंगणवाडी सेविका आपल्या घरात चटणी भाकरच खातात. तेच दाखवण्याचा प्रयत्न आंदोलनाच्या निमित्ताने केल्याची प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांनी दिली आहे.  

COMMENTS