अंबाजोगाई - अंबाजोगाई शहरातील नागरिक ’ डोळे आल्याच्या साथीने ’ हैराण आहेत ऍडडिनो व्हायरसमुळे डोळ्याचे रुग्ण वाढले आहेत. पावसाळ्यात आर्द्रता मोठ्
अंबाजोगाई – अंबाजोगाई शहरातील नागरिक ’ डोळे आल्याच्या साथीने ’ हैराण आहेत ऍडडिनो व्हायरसमुळे डोळ्याचे रुग्ण वाढले आहेत. पावसाळ्यात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे व्हायरस पसरण्याची आयती संधी मिळते आहे. ओलाव्यामुळे संसर्ग बराच काळ शरीरात राहतो. त्यामुळे आपल्याला वारंवार घाम येतो आणि यामुळे आपण आपला चेहरा पुसत राहतो. चेहरा पुसताना आपण डोळ्यांनाही हात लावत राहतो. या सर्व कारणांमुळे संसर्ग होतो आणि डोळे येण्याची साथ पसरतेय. यामुळे खुप रुग्ण डोळ्याच्या आजाराने त्रस्त आहेत.
डोळे येण्याची लक्षणे खालील आहेत डोळे लाल होणे.वारंवार पाणी गळणे.डोळयाना सूज येणे.काही वेळा डोळ्यातून चिकट द्रवपदार्थ बाहेरील बाजूस येतो.डोळ्याला खाज येते.डोळे जड वाटतात आणि डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटते.
डोळे आल्यास खालील प्रकारे काळजी घ्यावी डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे.इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने डोळे पुसू नये. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये. घराबाहेर जाताना गॉगल वापरा. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा.आपल्या सभोवतालाचा परीसर स्वच्छ ठेवावा.महाविद्यालये विद्यालये, वसतीगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे.डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एकापासून दुसर्या व्यक्तीला वेगाने संसर्ग होतो, त्यामुळे नियमीत हात धुवावा.डॉक्टाराच्या सल्यानुसारच औषधं डोळ्यात टाकावी. विविध शहरात डोळ्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आरोग्य केंद्रात डोळे आल्यानंतर स्टेरॉईड आय ड्रॉपचा वापर टाळावा, सर्व रुग्णांनी जवळच्याआरोग्य केंद्र किंवा रुग्णालय येथे संपर्क साधून उपचार घ्यावे असा सल्ला वैद्यकीय यंत्रणेने दिला आहे.एखाद्या रुग्णाचे डोळे आल्यास तीन ते पाच दिवस त्याचा इफेक्ट राहतो असे डॉक्टरांनी सांगितले. कंजंक्टिव्हायटिस असे या विकाराचे नाव आहे. डोळ्याच्या बाहेरील पडद्यावर जंतूसंसर्ग होतो. या साथीचा फैलाव थाबवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, हातापायांची स्वच्छता ठेवावी. डोळ्यात टाकावयाचे ड्रॉप एकमेकांना शेअर करू नयेत.शक्यतो संपर्क टाळावा. असे वैद्यकीय यंत्रणेने आवाहन केले आहे.
COMMENTS