’अ‍ॅमेझॉन’ कंपनी धर्मांतरासाठी निधी पुरवते!

Homeताज्या बातम्यादेश

’अ‍ॅमेझॉन’ कंपनी धर्मांतरासाठी निधी पुरवते!

आरएसएसच्या ऑर्गनायझर मासिकातून थेट आरोप

नवी दिल्ली : कर्मचारी कपातीमुळे चर्चेत आलेली अ‍ॅमेझॉन ही कंपनी भारतात धर्मांतरणासाठी निधी देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. भारतात धर्मांतरासाठ

कांद्यासह भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी अडचणीत
उस्मानाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न | LokNews24
मनू भाकरने पटकावले कांस्यपदक

नवी दिल्ली : कर्मचारी कपातीमुळे चर्चेत आलेली अ‍ॅमेझॉन ही कंपनी भारतात धर्मांतरणासाठी निधी देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. भारतात धर्मांतरासाठी पैसा पुरवत असल्याचा आरोप ई कॉमर्स कंपनी अमेझॉनवर करम्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणारे मॅगझिन द ऑर्गनायजर यात एका लेखात अमेझॉन भारताच्या ईशान्य भागात धर्मांतरासाठी पैसे पुरवत असल्याचा आरोप केला आहे. अमेझॉनने मात्र धर्मांतराला फंडिंग केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.
ऑर्गनायझर मासिकात ’द अमेझिंग क्रॉस कनेक्शन’ नावाने प्रकाशित कव्हर स्टोरीत अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीवर ईशान्य भारतातील राज्यांमध्ये धर्मांतरासाठी निधी पुरवल्याचा आरोप केलाय. त्यानुसार अ‍ॅमेझॉन कंपनीचे अमेरिकन बॅप्टिस्ट चर्च म्हणून ओळखल्या जाणार्‍या संस्थेशी आर्थिक संबंध आहेत. या चर्च परिसरात कन्व्हर्जन मॉड्युल चालवत असल्याचा दावा मासिकाने केला आहे. मात्र, अ‍ॅमेझॉनने हे आरोप फेटाळून लावले आहेत. ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅॅमेझॉन अमेरिकन बॅप्टिस्ट चर्चद्वारे चालवल्या जाणार्या ख्रिश्‍चन कन्व्हर्जन मॉड्यूलला वित्तपुरवठा करत आहे. भारताच्या मोठ्या मिशनरी धर्मांतर मोहिमेला निधी देण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि अमेरिकन बॅप्टिस्ट चर्च द्वारे मनी लाँड्रिंग रिंग चालवण्याची शक्यता असल्याचे मासिकाने म्हटले आहे. एबीएम भारतात ऑल इंडिया मिशन (एआयएम) नावाची संघटना चालवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही त्यांची आघाडीची संघटना आहे जी त्यांच्या वेबसाइटवर उघडपणे दावा करते की त्यांनी ईशान्य भारतात 25 हजार लोकांचे ख्रिश्‍चन धर्मात धर्मातर केले आहे. ऍमेझॉन कंपनी भारतीयांनी केलेल्या प्रत्येक खरेदीवर पैसे घेऊन संपूर्ण भारतात कन्व्हर्जन मॉड्यूलला समर्थन देत असल्याचा दावाही मासिकाने केला आहे. यापूर्वी, हिंदू देवी-देवतांच्या प्रतिमा असलेल्या उत्पादनांची अ‍ॅमेझॉनवर विक्री करण्यात येत असल्याने भारतीयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.

COMMENTS