Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाला होणार दंड

पुणे महापालिकेचा निर्णय

पुणे : पुण्यात अनेक घरात पाळीव प्राणी हमखास दिसतो. या प्राण्यांना प्रातःविधीसाठी प्राणी मालक हे घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी घेऊन जातात. मात्

तब्बल नऊ वर्षांनंतरही संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा बट्याबोळ
कांदा चाळ उभारण्यासाठी मिळणार अनुदान
राज ठाकरेंच्या वक्तव्याविरोधातील समन्स रद्द

पुणे : पुण्यात अनेक घरात पाळीव प्राणी हमखास दिसतो. या प्राण्यांना प्रातःविधीसाठी प्राणी मालक हे घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी घेऊन जातात. मात्र, आता आपल्या घरच्या प्राण्याला असे बाहेर घेऊन जाणे मालकांना महागात पडणार आहे. पुणे पालिकेने एक नवा निर्णय जाहीर केला आहे. पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी विष्ठा केल्यास थेट आता मालकाला दंड ठोठावला जाणार आहे.
 सार्वजनिक परिसर प्राण्यांच्या विष्ठे मुळे अस्वच्छ होत असून, दुर्गंधी पसरते. तसेच अनेक पादचारी मार्ग, रस्ते देखील खराब होत आहेत. त्यामुळे महापालिकेने हा मोठा निर्णय घेतला आहे. याची पहिली कारवाई ही कोथरूड येथे करण्यात आली असून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी घरात मांजर पाळायची असल्यास महानगर पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय ताजा असताना आता पालिकेच्या घनकचरा विभागाच्या बैठकीत उघड्यावर पाळीव प्राण्यांनी विष्ठा केल्यास त्याच्या मालकाकडून 500 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यस्थापन ही जबाबदारी सांभाळणार आहे. घरातील पाळीव कुत्री आणि मांजरांचा या निर्णयात समावेश आहे. अनेक नागरिक हे आपल्या पाळीव प्राण्यांना बाहेर फिरायला नेत असतात. या प्राण्यांच्या विष्ठेमुळे सार्वजनिक ठिकाणी आणि बागांमध्ये दुर्गंधी आणि घाण होत असल्यामुळे याचा अनेक तक्रारी पालिकेला करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात प्राणी पाळण्यासाठी परवान्याची आवश्यकता आहे. अजूनही अनेक नागरिकांनी परवाने घेतलेले नाही. तसेच परवाना देताना प्राणी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार नाही, याची काळजी घ्यावी अशी सूचना देखील महापालिकेने दिलेली आहे. नागरिकांनी तातडीने हे परवाने काढण्याचे आवाहन देखील पालिकेने केले आहे.

COMMENTS