Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराईत पंडित-पवारांना पर्याय ; मस्के दाम्पत्यांची तालुक्यात घोडदौड

गेवराई प्रतिनिधी - गेवराईचे राजकारण म्हटलं की पंडीत-पवार असंच काहीसं गणित झाले आहे, कारण त्यांना आत्तापर्यंत कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न देखील क

भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संस्थाने निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध -आ.संदीप क्षीरसागर
रणधुमाळीचा धुराळा !
Maharashtra : मनपाची शाळा बनली जुगाराचा अड्डा (Video)

गेवराई प्रतिनिधी – गेवराईचे राजकारण म्हटलं की पंडीत-पवार असंच काहीसं गणित झाले आहे, कारण त्यांना आत्तापर्यंत कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न देखील केला नाही, त्यामुळे पंडित-पवारांच्या बंगल्याभोवतीच तालुक्याचे राजकारण चालत आले आहे. मात्र गेवराईच्या राजकारणात आता नव्याने भारत राष्ट्र समिती पक्षाची जोरदार एंट्री झाली असून बाळासाहेब मस्के व मयुरीताई मस्के-खेडकर या मस्के दाम्पत्यांनी लक्ष गेवराई विधानसभा हा अजेंडा घेऊन पंडित-पवारांना शह देण्यासाठी कंबर कसून जनसेवेच्या कामाला सुरुवात केली आहे. एकंदरीत त्यांची तालुक्यात घोडदौड जोरात सुरू आहे. तर पंडित-पवारांच्या राजकारणाला कंटाळलेले कार्यकर्ते व नवयुवकांची फौज बीआरएस पक्षात सहभागी होत असुन यामधून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी केली जात आहे. तसेच सध्या गाव तेथे आरोग्य शिबीर घेऊन मस्के दाम्पत्य तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा करत आहेत, यामधून त्यांना जनतेचे आशिर्वाद मिळत आहे. या आशिर्वादाच्या जोरावरच ’अब विधानसभा दूर नही’ म्हणत मस्के दाम्पत्यांनी पंडित-पवारांपुढे तगडे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे.
गेवराई मतदार संघात वर्षानुवर्षे घराणेशाहीची सत्ता चालत आली असून यामध्ये सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल अपेष्टा होत आहेत. हे चित्र गेल्या पन्नास वर्षापासून चालू असून तालुक्यात राजकीय परिवर्तन घडविण्यासाठी बाळासाहेब मस्के आणि मयुरी खेडकर-मस्के यांनी बीआरएसच्या माध्यमातून गेवराई मतदार संघात नवा पर्याय उभा केला केल्याची चर्चा जोरात सुरु आहे. भारत राष्ट्र समिती पक्षाच्या प्रवेशापासूनच बाळासाहेब मस्के यांनी मतदारसंघांमध्ये अनेक लोक कल्याणाचे कामे सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून गेवराई मतदार संघात नेत्र तपासणी शिबिर आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गावोगावी सुरू केले आहे. आठ दिवसांत नेत्र तपासणी करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यावेळी अनेक कवर नेत्र शस्त्रक्रिया सुद्धा झाल्या. हे शिबीर मतदारसंघातील गावोगावी सुरुच राहणार आहे. या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गेवराई मतदारसंघात बाळासाहेब मस्के आणि मयुरीताई खेडकर मस्के यांच्या नावाचीच चर्चा सध्या प्रामुख्याने होताना दिसत आहे. तर बाळासाहेब मस्के व मयुरी खेडकर हे नाव तालुक्यात परिचित झाले असून पंडित-पवारांच्या घराणेशाहीला व सूडाच्या राजकारणाला कंटाळलेले तरुण, नागरिक या दोघांना पाठिंबा दर्शवित आहेत. त्याचबरोबर बीआरएसच्या रूपाने पंडित-पवारांना मयुरीताई खेडकर-मस्के व बाळासाहेब मस्के यांनी नवा पर्याय उभा केल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. दरम्यान या गेवराई मतदार संघात परिवर्तन घडविण्यास सज्ज आहोत. येणार्‍या काळात गेवराई मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये हे नेत्र तपासणी शिबिर चालू राहणार आहे. तर तालुक्यातील रोज शेकडो कार्यकर्ते पाठिंबा दर्शवित असून गावागावात शाखाध्यक्ष, बुथप्रमुख, गण-गट प्रमुख ते तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या नेमणुका लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचे बीआरएसचे नेते बाळासाहेब मस्के यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS