Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरी नदीच्या पात्रातून केणीच्या सह्याने अवैध वाळू उपसा जोरात सुरू

बोरगावथडी कडे महसुलचे अर्थपुर्ण दुर्लक्ष

गेवराई प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात बोरगावथडी येथील गोदावरीच्या नदीपात्रातून पुन्हा मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केणीच्या सा

सलमान खानची हत्या पनवेलच्या फार्म हाऊसवर करण्याचा कट
कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ
विमान अचानक लँडिंग करण्याच्या घटनामंध्ये वाढ

गेवराई प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात बोरगावथडी येथील गोदावरीच्या नदीपात्रातून पुन्हा मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केणीच्या साह्याने केला जात आहे. यामुळे अक्षरशः नदीपात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून ते ग्रामस्थांसाठी जीवघेणे ठरणार आहे. शासनातर्फे वाळू लिलाव बंद असतांना देखील वाळू माफियांतर्फे सुरू असलेल्या या अवैध उपशाकडे स्थानिक महसुल, यंत्रणेने हेतुपुरस्पर अर्थपुर्ण दुर्लक्ष केले आहे. याप्रश्नी वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून वाळू उपसा थांबवावा, अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा लोकांनी दबक्या आवाजात चर्चा द्वारे दिला आहे. गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे यांनी नवीन पदभार घेतला असता तेव्हा गेवराई तालुक्यातील अनेक गांवात कारवाई चा धडाका लावला होता आता जसे तसेच चित्र दिसत आहे बोरगावथडी कडे का जाणुन बुजून दुर्लक्ष केले हा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध वाळू उपशाकडे लक्ष वेधले. यावेळी तलवाडा परिसरात  बोरगावथडी गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा चोरट्यांतर्फे सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. पावसाळ्यात या गोदावरी नदीपत्रात पत्रात  मोठ्या प्रमाणात पाणी साठा आसल्याने वाळू वाहून आली असल्याने वाळू माफियांना जणू पर्वणीच लाभली आहे. त्यामुळे रात्र दिवस करत ट्रॅक्टर व मिळेल त्या वाहनातून नदीपात्रातून उपसा करत वाळू लांबवली जात आहे. यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने भविष्यात पाणीटंचाईशी ग्रामस्थांना सामना करावा लागणार आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी होणारे खड्डे जीवघेणे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.बोरगावथडी गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या या वाळू चोरी संदर्भात महसुल  विभागने वाळू माफियांविरूध्द कारवाई केली परंतु पुन्हा  वाळू माफियांनी डोके वर काढल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे वाळु माफियाचे असलेले लागेबांधे दिसून येत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. गोदावरी पात्रातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील वाळू उपशामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू चोरीमुळे माफियांचे फावले आहे. तर शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. याची दखल घेत त्वरीत वाळू चोरट्यांविरूध्द कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा जनसामान्यांना कडून दिला जात आहे.

COMMENTS