राजकीय चिखलफेकीचा समेट

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकीय चिखलफेकीचा समेट

गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा पार्टीमध्ये सापडल्यानंतर झालेल्या वानखेडे प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता जरा कमी

‘पेगासस’चे भूत
आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे आणि उपाय योजना
भाजपचे धक्कातंत्र !

गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा पार्टीमध्ये सापडल्यानंतर झालेल्या वानखेडे प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता जरा कमी होवू लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाबमलिक यांनी एकमेकांच्या कर्तृत्वाच्या फायली उघडण्याच्या धमक्यादरम्यान केलेली चिखलफेक आता थांबल्यासारखी वाटू लागली आहे.
नवाब मलिकांच्या जावयाकडे ड्रग्ज सापडल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. दोघांनीही अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप-प्रत्यारोप केले आहेत. दरम्यान आता नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिकने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील नबाव मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. इतक्या दिवस या दोघांना किंवा त्यांच्या नातलगांना चिखलफेक करणार्‍यांच्या मान-सन्मानाबाबत काहीही वाटत नसल्याचे जाणवत आहे. त्यामुळे त्यांनी आता अब्रू वाचविण्यासाठी मानहानीच्या नोटीसा अटी-शर्तींच्या बोलीवर पाठविण्यास सुुरुवात केली आहे.
अमृता फडणवीस यांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये, नवाब मलिक यांनी येत्या 48 तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा, असे बजावले आहे. मानहानीच्या खटल्यासोबत फौजदारी कारवाई करणार असल्याचा इशारा देखील नोटिशीद्वारे दिला आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, निलोफर यांचे पती आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी हा आरोप केला होता. हा आरोप चुकीचा असल्याचा दावा करत निलोफर यांनी फडणवीस यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. दोन्ही कुटुंबातील लोकांचा अभिनेता शाहरुख खान याच्याशी काहीही संबंध नसताना विनाकारण अंगावर ओढून घेतलेले भांडण आता अंगाशी येवू लागले असल्याचे दिसून येवू लागले आहे. यातून दोघांनी कोणाचे कसे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. याबाबत चांगलेच तोंडसुख घेत एकमेकांनी केलेल्या भानगडी जगासमोर मांडल्या. यातून वसूली संचलनालयासह अनेक यंत्रणा चक्रावून गेल्या असल्याचे समजते. केंद्रामध्ये भाजपची सत्ता असल्याने भाजपला जो नडेल त्याला ईडी भिडेल असे तत्व गेल्या काही दिवसापासून सुरु असल्याचे आपणास पहावयास मिळत आहे. ईडीच्या भितीने अनेकांनी पक्षांतर करून भाजपच्या आश्रयास जाणेच पसंद केले असल्याचे आपणास पहावयास मिळेल. अशा एकंदर परिस्थितीमध्ये विदर्भातील भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे आपणास पहावयास मिळत आहेत. नुकतेच हिंगोली जिल्ह्यात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करून पुुतळ्याचे दहन करत निषेध नोंदवला. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशावरून भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण यांच्या नेतृत्त्वात येथील गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आले. यादरम्यान नवाब मलिक यांनी पदाचा राजीनामा देण्याचीही मागणी केली. जो पर्यंत नवाब मलिक राजीनामा देत नाहीत तो पर्यंत भाजपा युवा मोर्चा तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांचे नवीन पुस्तक ’सनराईज ओव्हर अयोध्या’ वादात सापडले आहे. या पुस्तकात त्यांनी हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हरामसारख्या कट्टरवादी संघटनांशी केली आहे. त्यावरून आता नवीन वाद सुरू झाला आहे. याप्रकरणी खुर्शीद यांच्यावर दिल्ली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकात ‘द सॅफ्रॉन स्काय’ या अध्यायात ही टिप्पणी केली आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, की सध्याच्या युगातील हिंदुत्वाचे राजकीय स्वरूप संत-सनातन आणि प्राचीन हिंदू परंपरेला बाजूला सारत असल्याचे दिसत आहे. ते आयएसआयएस आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामी संघटनांसारखे असल्यचे त्यांनी नमूद केले आहे. याबाबत दिल्लीतील वकील विवेक गर्ग यांनी पोलीस आयुक्तांना ’हिंदू धर्माची दहशतवादाशी तुलना आणि बदनामी’ केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. अ‍ॅड. गर्ग यांनी दिलेल्या माहितीमध्ये सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची बदनामी केली आहे. खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना दहशतवादाशी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

COMMENTS