Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजय बारसकर यांची प्रहारमधून हकालपट्टी

मुंबई ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यावर अजय महाराज बावसकर यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी क

अमेरिकास्थित माजी विद्यार्थ्यांने योगेश्वरी शाळेला दिले व्हाईट बोर्ड
‘हिंग पुस्तक तलवार’चा हास्यकल्लोळ आता जगभर ;३१ ऑगस्टपासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर
देवळाली प्रवरा नगरपालिका कामगार पतसंस्थेचा 22 लाख रुपयांचा लाभांश वाटप

मुंबई ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यावर अजय महाराज बावसकर यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने त्यांना पक्ष संघटनेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यासंबंधी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष महेंद्र जवंजाळ यांनी एक पत्र काढत, त्यांचा आजपासून पक्षाशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षण किंवा नेत्यांबद्दल कोणतीही भूमिका कोणीही मांडू नये. असे केल्यास त्या व्यक्तीचा प्रहार जनशक्ती पक्षाशी काहीही संबंध राहणार नाही, असे आदेश बच्चू कडू यांनी दिले असल्याचे या पत्रात म्हटले आहे. पक्षाची अधिकृत भूमिका हे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे स्वतः मांडणार असल्याचे देखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल मांडलेल्या भूमिकेमुळे त्यांना प्रहार जनशक्ती पक्ष तसेच प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS