Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊतांच्या विरोधात हक्कभंग समिती स्थापन

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग समितीची निवड केली. या समितीच्या प्रमुख

पोलिसांची राज्यातील सर्वात मोठी कारवाई… ३१ हजार किलो गोमांस जप्त
मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना दोघांचा मृत्यू
उरमोडीच्या पाण्यासाठी भाऊसाहेबांनी खर्च केली आमदारकीची 20 वर्षे : जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग समितीची निवड केली. या समितीच्या प्रमुखपदी आ. राहुल कुल, नितेश राणे आणि अतुल भातखळकर यांचा समावेश आहे. खा. संजय राऊत यांनी शिवसेना (शिंदे गट) नेत्यांच्या विधीमंडळ गटाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
खासदार संजय राऊत यांनी  शिंदे गटाचा उद्देशून विधीमंडाळावर आक्षेपार्ह शब्दात भाष्य केले. त्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनीदेखील संजय राऊत यांचं विधान योग्य नसल्याचे म्हटले होते. सत्ताधारी पक्षाने घेतलेला आक्रमक पवित्रा लक्षात घेता, विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग समिती नेमण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थापन केलेल्या हक्कभंग समितीत 15 सदस्यांचा समावेश आहे. आमदार राहुल कुल हे या समितीचे प्रमुख आहेत. त्यांच्याशिवाय, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जयस्वाल हे आमदार या समितीचे सदस्य असणार आहेत. या समितीत ठाकरे गटाच्या एकाही आमदाराचा समावेश नाही. विधानसभेच्या हक्कभंग समितीकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उद्याच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.विधानसभेचा अवमान किंवा हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार हा सभागृहाला असतो. अवमान करणारा व्यक्ती स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते. जर संबंधित व्यक्ती सभागृहाबाहेरील असेल तर त्याला तुरुंगवासापर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा समज देऊन सोडून दिले जाऊ शकते.

COMMENTS