Liger च्या अपयशानंतर सहनिर्मातीनं सोशल मीडियाला ठोकला रामराम

Homeताज्या बातम्यामनोरंजन

Liger च्या अपयशानंतर सहनिर्मातीनं सोशल मीडियाला ठोकला रामराम

125 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आठ दिवसांत 40 कोटींचा आकडा पार करू शकलेला नाही

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandey) स्टारर 'लाइगर' चित्रपटाची मोठ्या प्

केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |
मराठी पत्रकार परिषदेच्या संगमनेर तालुकाध्यक्षपदी शाम तिवारी

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandey) स्टारर ‘लाइगर’ चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा पहायला मिळाली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेवढी कमाल दाखवू शकला नाही. हा चित्रपट फ्लॉप झाला आणि तो पाहिल्यानंतर लोकांच्या सतत नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. 125 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आठ दिवसांत 40 कोटींचा आकडा पार करू शकलेला नाही. लाइगरच्या अपयशामुळे चित्रपटाची सहनिर्माती चार्मी कौर(Charmy Kaur) ने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. चार्मी कौरनं ट्विटरवर सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली. चार्मी म्हणाली, ‘चिल मित्रांनो! सोशल मीडियातून फक्त ब्रेक घेत आहे. पुरी जगन्नाथ दमदार प्रदर्शनासह परत येतील…तोपर्यंत जगा आणि जगू द्या’. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

COMMENTS