Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांची टीकेची झोड

मुंबई/प्रतिनिधी ः भाजपच्या ‘महाविजय 2024 लोकसभा प्रवास’ या ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्यभर फिरत आहेत. याच कार्

ट्रक – बसच्या भीषण दुर्घटनेत 8 ठार तर 26 जण गंभीर जखमी l LOKNews24
इलेक्ट्रॉल बाॅंड बंदी : एक वस्तुस्थिती !
आ.आशुतोष काळेंना सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून द्या : सत्येन मुंदडा

मुंबई/प्रतिनिधी ः भाजपच्या ‘महाविजय 2024 लोकसभा प्रवास’ या ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्यभर फिरत आहेत. याच कार्यक्रमासाठी ते खासदार सुजय विखे पाटील यांच्या मतदार संघात होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांमध्ये आपल्या विरोधात बातम्या येऊ नयेत, यासाठी काय काळजी घ्यायची, त्यासाठी ‘पत्रकारांना दर महिन्याला चहाला बोलवा, त्यांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा, पत्रकारांना दर महिन्याला चहा प्यायला बोलवायचे म्हणजे काय, हे तुम्हाला समजलेच असेल. असे सांगायलाही बावनकुळे विसरले नाहीत. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी बावनकुळेंवर टीकेची झोड उठवली आहे.
यावर बोलतांना काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले म्हणाले की, सत्ताधार्‍यावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करत असतात. परंतु हा आवाज दाबण्यासाठी पत्रकारांना चिरीमिरीचे आमिष देण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी. येड्या सरकारचे लोकप्रतिनिधी आता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला खरेदी करू पाहत आहेत.

COMMENTS