त्या 14 मृत्यूंच्या कारणाचे गूढ अजूनही कायम…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्या 14 मृत्यूंच्या कारणाचे गूढ अजूनही कायम…

सिव्हीलमधील आगीला वर्ष पूर्ण, नव्या पालकमंत्र्यांकडूनही दुर्लक्ष

अहमदनगर प्रतिनिधी:- मागच्यावर्षीच्या दिवाळीत ऐन भाऊबीजेच्या दिवशी 6 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नगरच्या सिव्हील रुग्णालया(Civil Hos

म्युकरमायकोसिसची औषधे कोठूनही मागवा l पहा LokNews24
भारत संकल्प यात्रेचे धोत्रे गावात जोरदार स्वागत
सनफार्मा आगीतील दोषींवर गुन्हे दाखल करा- मंत्री कड़ू

अहमदनगर प्रतिनिधी:- मागच्यावर्षीच्या दिवाळीत ऐन भाऊबीजेच्या दिवशी 6 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नगरच्या सिव्हील रुग्णालया(Civil Hospitals) तील अतिदक्षता विभागाला आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला. या घटनेला आज बुधवारी (26 ऑक्टोबर) भाऊबीजेच्या दिवशी एक वर्ष पूर्ण होत आहे. सिव्हीलच्या आगीमध्ये झालेल्या 14 जणांच्या मृत्यूंपैकी काही आगीत जळाल्याने व काही धुराने गुदमरल्याने झाले असले तरी ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली, याचे गूढ अजूनही कायम आहे. यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने राज्य सरकारला स्पष्ट अहवाल दिला असल्याचे सांगण्यात येते. पण मागील महाविकास आघाडी सरकारने व आताच्या शिंदेशाही-भाजप सरकारनेही हा अहवाल जनतेसाठी जाहीर केलेला नाही. दरम्यान, नगरचे नवे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांनी मागील 3 ऑक्टोबरला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर सिव्हील आगीच्या कारणांचा अहवाल आठ दिवसात जाहीर करण्याची ग्वाही दिली होती. पण त्यांचे हे आठ दिवस अजूनही प्रतीक्षेत आहेत.

नगर जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमधील आयसीयू क्रमांक एक वॉर्डमध्ये मागील वर्षीच्या भाऊबीजेच्या दिवशी (दि.6नोव्हेंबर) अग्नितांडव घडून 12 रुग्णांचा करुण मृत्यू होऊन आणि 5 रुग्ण जखमी झाले होते. त्यानंतर जखमींपैकी आणखी दोघांचे नंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाले. या घटनेची चौकशी करण्यासाठी शासनाने नेमलेल्या नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे(Radhakrishna Game) यांच्या अध्यक्षतेखालील आठ सदस्यीय समितीने सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग, विद्युत विभागासह इतर संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांची चौकशी करून अहवाल तयार केला होता. विद्युत विभागाच्या मुंबईच्या तज्ज्ञांच्या पथकानेही सिव्हीलमध्ये तपासणी करून तेथे नेमकी आग कोणत्या तांत्रिक कारणाने लागली, याचा शोध घेतला होता व विभागीय आयुक्तांच्या चौकशी समितीपुढे त्यांचा स्वतंत्र अहवाल सादर केला होता. त्या अहवालासमवेत विभागीय आयुक्तांनी त्यांचा अहवाल मागील महाविकास आघाडीच्या सरकारकडे दिला. मात्र, त्या सरकारने तो अहवाल जनतेसाठी जाहीर केला नाही. त्यावेळी नगरचे पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनीही हा अहवाल मिळवण्यासाठी राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत असल्याचे तेव्हा सांगितले होते. पण त्यांच्या या पाठपुराव्यालाही अपयश आल्याची कबुलीही त्यांना नंतर द्यावी लागली. त्यानंतर राज्यातील नव्या सरकारमधील पालकमंत्री विखे यांनीही, सिव्हील आगीची घटना गंभीर असून, ती नेमक्या कोणत्या कारणाने लागली, याचा अहवाल आठ दिवसात जाहीर करण्याचे सुमारे 20 दिवसांपूर्वी नगरच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. पण अजूनही त्यांना हा अहवाल जाहीर करण्यास मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसत आहे.

गुन्ह्याचे आरोपपत्र प्रतीक्षेत

नगर जिल्हा रुग्णालय आगीच्या घटनेनंतर तोफखाना पोलिस ठाण्यात डॉ. विशाखा शिंदे(Dr. Visakha Shinde) यांच्यासह चन्ना अनंत,(Channa Anant,) सपना पठारे( Sapna Paṭhārē ) आणि आसमा शेख(Asma Sheikh) या तीन स्टाफ नर्सच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे दोषारोप पत्र अजून न्यायालयात दाखल झालेले नाही. यासाठीची शासनाची परवानगी प्रतीक्षेत आहे तसेच आग लागल्यानंतर अतिदक्षता विभागातील रुग्णांना जीव वाचवण्यासाठी मदत केली नसल्याने निष्काळजीपणाचा ठपका ठेवून शासनाने तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा(Dr. Sunil Pokrana) यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे,(Dr. Suresh Dhakne,) डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह स्टाफ नर्स सपना पठारे यांच्यावर निलंबनाची तर चन्ना अनंत आणि आसमा शेख या दोघी स्टाफ नर्सवर सेवा समाप्तीची कारवाई केली होती. यातील डॉ. पोखरणा यांचे निलंबन नंतर रद्द करून त्यांना शिरूरच्या रुग्णालयात नियुक्ती दिली गेली. त्यावरूनही मोठे रणकंदन झडले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Governor Bhagat Singh Koshyari) यांनी त्यांच्या अधिकारात ही नियुक्ती दिल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारने केला होता. पण राज्यपाल कार्यालयाने स्वतःहून नव्हे तर महाविकास आघाडी सरकारनेच ही नियुक्ती दिल्याची कबुली राज्यपाल कोश्यारींपुढे सुरू असलेल्या सुनावणीत राज्य सरकारच्या अधिकार्‍यानेच दिली असल्याचे राज्यपालांच्या कार्यालयाने स्पष्ट केल्याने महाविकास आघाडी तोंडावर पडली. त्यावेळी राज्यपालांच्या आदेशावरून डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द झाले किंवा त्यांची पदस्थापना झाली, हे वृत्त चुकीचे असल्याचे राजभवनतर्फे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते, त्यामुळे तोही विषय चर्चेचा झाला होता.

अनेक  मुद्दे अजूनही अनुत्तरीत -सिव्हीलमध्ये लागलेली आग नेमक्या कोणत्या तांत्रिक त्रुटीने लागली व त्या तांत्रिक त्रुटीला कोण जबाबदार आहेत?

2) आगीची घटना घडल्यावर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी सिव्हीलमध्ये निकृष्ट दर्जाचे व्हेंटीलेटर पीएम केअर फंडातून लावल्याचा आरोप केला होता. त्याच्या चौकशीचे पुढे काय झाले?

3) कोरोना काळात सिव्हीलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी अखंड वीज पुरवठा व्हावा म्हणून एक्सप्रेस फीडरद्वारे वीजपुरवठा केला गेला होता. पण या एक्सप्रेस फीडरमधून एका खासगी रुग्णालयास वीज पुरवठा केला गेला असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी केला होता. या आरोपाच्या चौकशीचे काय झाले?

4) सिव्हील आग प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवताना एकाच्यावतीने जिल्हा प्रशासनाबाबत झारीतील शुक्राचार्य असा शब्दप्रयोग वापरला गेला होता. या शब्दप्रयोगाबाबत नंतर कोणीही प्रत्युत्तरही दिले नाही व खुलासाही केला नाही. त्यामुळे या शब्द प्रयोगाचेही गूढ अजूनही कायम आहे.

COMMENTS