Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने घेतले शनिदर्शन

सोनई/प्रतिनिधी ः बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी काल सायंकाळी 4 च्या सुमारास हेलिकॉप्टरने येऊन शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची विधिवत पूजा

रायगडावर अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा
मा. नामदार आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जनता इंग्लिश स्कूल संवत्सर विद्यालयात शालेय वस्तूचे वाटप.
नेवासा येथे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

सोनई/प्रतिनिधी ः बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी काल सायंकाळी 4 च्या सुमारास हेलिकॉप्टरने येऊन शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची विधिवत पूजा करून सहकुटुंब सह शनिदर्शन घेतले. सोबत आई, पती राजकुंदरा, लहान मुलगी, परिवार होता. शेट्टी यांनी अभिप्राय व्यक्त करताना म्हणाल्या की, मी दरवर्षी शनी दर्शनासाठी येत असते, मला एक आत्मिक आनंद, समाधान, ऊर्जा मिळते. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून नेत्रदानाचा संकल्प केला होता, त्यावर त्यांनी उजाळा दिला, तेव्हा त्यांनी कौतुक केले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी कुटुंबातील सदस्य सोबत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. देवस्थानचे वतीने उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी स्वागत केले. दरम्यान काल सोनई येथे यशवंत सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने कृतज्ञाता पुरस्कार प्रदान करण्याच्या अगोदर ग्रामविकास भूषण पोपटराव पवार, उद्योग समूहाचे हनुमंत राव गायकवाड,महिला सबलीकरण उद्योजक कमलताई परदेशी यांना जेष्ठ साहित्यीक माजी खा.यशवंतराव गडाख यांचे हस्ते नुकताच करण्यात आला. दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एम.आय.डी. सी. गावचे सरपंच अविनाश कोळी यांच्यासह सदस्य यांनी शनिदर्शन घेतले, त्यांचे स्वागत माजी सरपंच ऍड. राजेंद्र बोरुडे, पत्रकार विजय खंडागळे यांनी केले. यावेळी भाविकांची गर्दी होती.

COMMENTS