Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिनेता नाना पाटेकर यांच्याकडून अभिवादन

कराड / प्रतिनिधी : कराड येथे युवा महोत्सवात युवकांशी संवाद साधण्यासाठी आलेले सिने अभिनेते व नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी स्व. यशवंतराव चव्हाण

Aurangabad : वाढलेल्या महागाईवर भाजपाने जनतेचेआशीर्वाद मागायला पाहिजे – आ. आंबादास दानवे l Lok News24
सातारा पालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरे बांधण्याच्या निविदेमध्ये घोटाळा; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल : सुशांत मोरे
श्री सिध्दनाथ देवी जोगेश्‍वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ

कराड / प्रतिनिधी : कराड येथे युवा महोत्सवात युवकांशी संवाद साधण्यासाठी आलेले सिने अभिनेते व नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जावून दर्शन घेतले. कराड येथे नाना पाटेकर यांचे स्वागत करण्यात आले. मात्र, त्या अगोदर आपण यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यास जाणार असल्याचे नानांनी संयोजकांना सांगितले.
समाधीस्थळी नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर, सुधीर चिवटे, गणेश थोरात, कॅप्टन आशा शिंदे, प्रविण पाटील आणि नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अनेक राजकीय नेते अभिवादनास येत असतात. परंतू सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या हजेरीला एक वेगळे महत्व आहे. कारण सिनेसृष्टीतील लोक या समाधी स्थळाकडे फारसे फिरकताना दिसत नाहीत. त्यात नाना पाटेकर हे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील एक मोठे व्यक्तिमत्व समाधीस्थळी हे तशी मोठी गोष्ट आहे. त्यात नाना पाटेकर हे अभ्यासू जाणकार व्यक्तिमत्व आहे.
यावेळी नाना पाटेकर आपल्या नेहमीच्या साध्या वेशात व पोशाखात पहायला मिळाले. साधा पॅन्ट, लेंगा अन् अंगावर टॉवेल पहायला मिळाला. नाना पाटेकर प्रितीसंगम घाटावर आल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.

COMMENTS