Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उल्हासनगर महापालिकेच्या भूखंडावरील बांधकामावर कारवाई

उल्हासनगर/प्रतिनिधी : कॅम्प नं-5 गायकवाड पाडा येथील महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या जागेवरील अवैध बांधकामावर सोमवारी दुपारी अतिक्रमण विभागाने पा

आधी तरुणावर अनैसर्गिक अत्याचार,मग अल्पवयीन तरुणीवर गँगरेप | LOKNews24
पावसामुळे यंत्रणांनी सतर्क रहावे ः मुख्यमंत्री शिंदे
केवायसी करणे पडले महागात; 97 हजार रुपयांना गंडा

उल्हासनगर/प्रतिनिधी : कॅम्प नं-5 गायकवाड पाडा येथील महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या जागेवरील अवैध बांधकामावर सोमवारी दुपारी अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई केली. यावेळी विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी अवैध बांधकामावर कारवाईचे संकेत दिल्याने, भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.
उल्हासनगर महापालिका भूखंड, भाजी मार्केट जागा, सार्वजनिक शौचालय, शाळेची जागा आदीवर अवैध बांधकामे होत आहे. गेल्या आठवड्यात इंदिरा गांधी भाजी मार्केट व साईबाबा मंदिर येथील व्यापारी गाळ्यावर अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई केली. त्यानंतर कॅम्प नं-5, गायकवाड पाडा येथील महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या भूखंडावर अवैध बांधकामे उभे राहिल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांना मिळाली. त्यांनी सोमवारी दुपारी पोलीस संरक्षणात जेसीबी मशीनने अवैध बांधकाम जमीनदोस्त केले. महापालिका जागा, भूखंड यावरील अवैध बांधकामे जमीनदोस्त करण्याचा इशारा यावेळी शिंपी यांनी दिला. अतिक्रमण विभागाच्या या पाडकाम कारवाईने भूमाफियांचे धाबे दणाणले असून अवैध बांधकामा वरील कारवाईचे संकेत शिंपी यांनी दिली.

COMMENTS