विवेक कोल्हे यांचे कार्य रूग्णांना नव संजीवनी देणारे :  चव्हाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवेक कोल्हे यांचे कार्य रूग्णांना नव संजीवनी देणारे : चव्हाण

कोपरगाव शहरासह संपूर्ण मतदारसंघामध्ये कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर होत आहे.

राष्ट्रीय सहकार धोरण आणि सरकारमुळे विकास प्रक्रियेत अधिक गतिमानता ः विवेक कोल्हे
श्री वृध्देश्‍वर दूध संघाच्या दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान वर्ग
अहमदनगर जिल्ह्यात 30 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

कोपरगाव शहर प्रतिनीधी- कोपरगाव शहरासह संपूर्ण मतदारसंघामध्ये कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर होत आहे.रुग्णांसाठी बेड मिळेना तर कणाला आॕक्सीजन मिळेना त्या पाठोपाठ रेमडीशिवर इंजेक्शनचा काळाबाजार यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहे. रुग्णांना उपचार घ्यायचे तरी कोठे व कसे हा मोठा गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता.तालुक्यातील या पाश्र्वभूमीवर या सर्व परीस्थितीचे अवलोकन केल्या नंतर संजीवनी उद्योग समुहाचे चेअरमन बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा सहकारी बंँकेचे संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी ५०० बेड असलेले कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रूग्णांना नवसंजिवनी देणारा असल्याचे प्रतिपादन जेऊर कुंभारी ग्रामपंचायतचे उपसरपंच जालींदर चव्हाण यांनी केले आहे. 

येत्या दोन तीन दिवसांतच आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कुल वस्तीगृह कोकमठाण येथे ५oo बेडचे कोविड सेंटर सुरु होणार असल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आता दिलासा मिळणार आहे. संजीवनी उद्योग समुहाचे चेअरमन बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक कोल्हे आपत्ती काळात नागरीकांच्या मागे खंबीरपणे ऊभे असतात मागील वर्षी कोरोना काळात संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमातुन नागरीकांना मोफत सॅनिटायझर वाटप,जंतुनाशक औषधाची फवारणी तसेच नैसर्गिक आपत्तीकाळात पुरग्रस्तांना तसेच अवकाळी पावसाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला असुन याही वर्षी कोरोना संकटकाळात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे सभासद,तसेच कर्मचारी यांचे मोफत लसीकरण केले आहे. या पाश्र्वभुमीवर विवेक कोल्हे कोविड रूग्णांसाठी कोविड सेंटर उभारणार असल्याने त्यांच्या कार्याचा जेऊर कुंभारी पंचक्रोशीतील नागरीकांना सार्थ अभिमान असल्याचे जेऊर कुंभारीचे उपसरपंच जालींदर चव्हाण यांनी सांगीतले आहे .

COMMENTS