Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमली पदार्थांची तस्करी करणारा आरोपी अटकेत

मुंबई ः गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी तीन

प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या | LOKNews24
भाजपआघाडीतून आणखी एक पक्ष बाहेर
ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याची हत्या

मुंबई ः गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचे एमडी जप्त केले. शिवाजी नगर पोलीस ठाण्याने गोवंडी परिसरात अंमलीपदार्थविरोधात मोहीम हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मेहताब शेख या अमलीपदार्थ तस्करला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून 20 ग्राम एमडी जप्त केले. हे अंमलीपदार्थ जाबीर अन्सारी यांच्याकडून घेल्याचे मेहताबने चौकशीत पोलिसांना सांगितले. त्यानुसार शिवाजी नगर पोलिसांनी अन्सारीचा शोध सुरू केला. अन्सारी 15 मे रोजी शिवाजी नगर परिसरातील बंजारा चाळ येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

COMMENTS