सांगोला प्रतिनिधी - कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या कोल्हापुरातील वारकऱ्यांवर काल काळाने घाला घातला. पायी जात असलेल्या दिंडीत एक कार
सांगोला प्रतिनिधी – कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या कोल्हापुरातील वारकऱ्यांवर काल काळाने घाला घातला. पायी जात असलेल्या दिंडीत एक कार घुसल्याने ७ वारकऱ्यांचा मृत्यू तर पाच जखमी झाले आहेत. सर्व वारकरी हे कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील होते. दरम्यान माहिती रात्रीच मिळताच गावातील सरपंच आणि काही गावकरी सांगोल्याच्या दिशेने रवाना झाले. तर आज सकाळी सर्व मृतदेहावर शोकाकुल वातावरणात गावातच सामूहिकरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS