Homeताज्या बातम्यासंपादकीय

अपघात आणि सुरक्षेची चिंता

अपघात म्हटले की, अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर येतात वाहनांचे अपघात पण अनेक नैसर्गिक घटनाही यात येतात. अपघात य

प्रदूषणामुळे मिळेना शुद्ध हवा
राज्यसभा आणि राजकीय गणित
संसदेचे अधिवेशन पाण्यात

अपघात म्हटले की, अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर येतात वाहनांचे अपघात पण अनेक नैसर्गिक घटनाही यात येतात. अपघात या शब्दाची काटेकोर व्याख्या करणे अवघड आहे, पण पूर्वसूचनेशिवाय, ध्यानीमनी नसता घडलेली घातक घटना असा ‘अपघात’ या शब्दाचा सामान्य अर्थ होतो. मात्र रस्ते अपघातातून होणारे मृत्यू चिंताजनक आहे. ही संख्या सातत्याने वाढत चालल्याचे दिसून येत आहे. यातून देशातील प्रत्येक व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा प्रतिबिंबित होतांना दिसून येत आहे. राज्यातच नव्हे तर देशभरात अपघाताचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे घराबाहेर पडलेली व्यक्ती घरात पुन्हा सुरक्षित परतेल की नाही, अशी शंका निर्माण होतांना दिसून येत आहे. कारण अपघाताची संख्या प्रचंड वाढली असून, आपण कितीही सुरक्षित गाडी चालवली तरी, समोरच्याची चूक आपल्या जीवावर बेतणार नाही कशावरून. त्याचबरोबर भारतीय वाहतूक कायद्यांची किती गंभीरपणे अंमलबजावणी केली जाते, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात दरवर्षी सुमारे सरासरी 35 हजार अपघात होत असल्याची माहिती राज्य महामार्ग पोलिसांनी दिली होती. त्यानुसार रस्ते अपघातात केवळ महाराष्ट्र राज्यात दररोज सुमारे 37 जणांचा मृत्यू होतो, जर दररोज 37 जणांचा मृत्यू होतो. हा आकडा महाराष्ट्रातील आहे. तर दुसरीकडे देशामध्ये दररोज मृत्यू होणार्‍यांची संख्या न विचारलेलीच बरी. अपघाताचे प्रमाण वाढत आहे, रस्त्यांवर धावणार्‍या गाड्यांत दररोज वाढ होतांना दिसून येत आहे, मात्र त्या तुलनेत मिळणार्‍या सोयी-सुविधा, चांगले रस्ते, सर्रास होणारे नियमांचे उल्लंघन याकडे लक्ष देेण्याची गरज आहे. एवढी मोठी संख्या अपघातात मृत्यूमृखी पडत असतांना देखील आपण, गांभीर्याने बघत नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केलेल्या दाव्यानुसार महाराष्ट्रातच गेल्या सहा महिन्यांत म्हणजे जानेवारी 2023 ते जून 2023 या सहा महिन्यांच्या कालावधीत पाच हजार 897 प्राणांतिक अपघात होऊन त्यांत सहा हजार 437 जणांचा मृत्यू झाला, तर मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर डिसेंबर 2022 ते 3 जुलै या सात महिन्यांतील 51 प्राणांतिक अपघातांत 106 जणांचा बळी गेला. राज्यात 2019 ते मे 2023 या कालावधीत एक लाख 35 हजार 103 रस्ते अपघात झाले. त्यापैकी 55 हजार 69 प्राणांतिक अपघात होते. त्यांत 59 हजार 546 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यातील 2023 मधील प्राणांतिक अपघातांच्या तुलनेत समृद्धी महामार्गावरील प्राणांतिक अपघातांचे प्रमाण केवळ 0.85 टक्के असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केला आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी राज्यात किती प्रभावी उपाययोजना राबवण्यात येत आहे, आणि किती अपघाताचे प्रमाण कमी झाले याची आकडेवारी समोर येते. त्यामुळे सरकारला, यंत्रणेला अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्याशा वाटत नसल्याचेच दिसून येत आहे. आपल्या देशातल्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे दहा टक्के मृत्यू अपघातांमुळे होतात. रस्त्यावरच्या अपघातांमध्ये मरणा-यांपेक्षा नुसते जखमी होणा-यांचे प्रमाण पंधरापट आहे. अपघातांमधून वाचलेल्या अशा व्यक्तींमध्ये काही अल्पकालीन किंवा दीर्घकालीन परिणाम राहतात. राज्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जातात, परंतु तरीही अपघात कमी झाले नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अपघात रोखण्याचे मोठे आव्हान देशासमोर आहे. त्यासाठी नव-नवे तंत्रज्ञान विकसित होण्याची गरज आहे. त्यासोबतच वेगाला मर्यादा आणणे देखील गरजेचे आहे.

COMMENTS