बेंगळुरू : कर्नाट विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस नेते युटी अब्दुल कादर यांची एकमताने निवड करण्यात आलीय. अब्दुल कादर हे मंगळुरू शहरातून 5 वेळा आमदार

बेंगळुरू : कर्नाट विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस नेते युटी अब्दुल कादर यांची एकमताने निवड करण्यात आलीय. अब्दुल कादर हे मंगळुरू शहरातून 5 वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. कर्नाटकात एकूण 224 जागांपैकी काँग्रेस पक्षाने 135 जागांवर विजय मिळविल्यानंतर 20 मे रोजी बेंगळुरूच्या कांतीविरा स्टेडियमवर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह एकूण 8 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली होती.
COMMENTS