दुकानात काम करण्यास नकार दिल्याने युवकास मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुकानात काम करण्यास नकार दिल्याने युवकास मारहाण

संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद

बुलढाणा प्रतिनिधी  - शेजारच्या कपडा दुकानात काम करणाऱ्या युवकासह मालकाला दुसऱ्या दुकान चालकाने मारहाण केल्याची घटना मेन रोडवरील शिव कलेक्शन(Shiva Co

नाशिक येथे युवासेना मेळावा संपन्न
कर्जतच्या ’तहसील’मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाची पायमल्ली
नथुराम गोडसेसोबत अन्यायच झाला

बुलढाणा प्रतिनिधी  – शेजारच्या कपडा दुकानात काम करणाऱ्या युवकासह मालकाला दुसऱ्या दुकान चालकाने मारहाण केल्याची घटना मेन रोडवरील शिव कलेक्शन(Shiva Collection) मध्ये घडली असून संपूर्ण घटना CCTV मधे कैद झाली आहे. खामगाव शहरातील मेन रोड वरील शिव कलेक्शन दुकानात काम करणारा आशिष मिलिंद वानखडे (१८) याला शेजारच्या कपडा दुकानचे हाफीज बुराणी याने ‘तु माझ्या दुकानात काम कर मी तुला जास्त पगार देतो’ असे म्हटले. यावेळी आशिषने नकार दिला असता बुरानी व अविनाश या दोघांनी आशिषला मारहाण करून जखमी केले. दुकान मालक सागर धनोकार हा समजावण्यासाठी गेला असता त्यास वरील दोघांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी हाफीज बुरानी व अविनाश या दोघांविरुध्द  गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS