Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला पोलिस कर्मचार्‍याचा लोकलमधून पडून मृत्यू

मुंबई: लोकलने प्रवास करणार्‍या एका महिला पोलीस कर्मचार्‍याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे. याबाबत कुर्

मांडूळ तस्करीचा पर्दाफाश; तिघांकडून जिवंत मांडूळ हस्तगत
अनिल परबांचा स्वत:च्याच कार्यालयावर हातोडा
प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरची सुट्टी होणार?

मुंबई: लोकलने प्रवास करणार्‍या एका महिला पोलीस कर्मचार्‍याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. अश्‍विनी डोमडे (वय 27) असे या मयत महिला पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. ही महिला लोकलने प्रवास करत असताना लोकलमधून पडली.नाहूर रेल्वे स्थानकातील कर्मचार्‍यांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमी महिलेला मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्या ओळखपत्रावर तिने अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतल्याचे समोर आले आहे. त्यानुसार कुर्ला लोहमार्ग पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

COMMENTS