Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुयारी मेट्रो 3 प्रवासादरम्यान मिळणार अखंडीत मोबाईल सेवा

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना अखंडित मोबाईल सेवा पुरविण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

पाऊस थांबला, विसर्ग घटला !
शेतीच्या वाटपातून वृद्धाचा गळा दाबून खून
आमदार राणेंची मतदारांना धमकी

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना अखंडित मोबाईल सेवा पुरविण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने पुढाकार घेतला आहे. प्रवासादरम्यान मोबाईल नेटवर्कची समस्या निर्माण होऊ नये यासाठी एमएमआरसीने सौदी अरेबियातील रियाध शहरात असलेल्या एसीईएस या कंपनीच्या इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीशी करार केला आहे. त्या करारानुसार संबंधित कंपनीकडून मेट्रो 3 करता दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत.
 रियाध येथे आयोजित एका कार्यक्रमात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्‍विनी भिडे, संचालक (नियोजन आणि रिअल इस्टेट डेव्हलपमेंट) आर. रमणा, संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय विभागातील दूरसंचार आणि पायाभूत सुविधांचे उपमंत्री बस्सम ए. अल-बस्सम, एसीईएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अक्रम अबुरस, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. खालिद अलमाशौक, एसीईएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद मजहर तसेच अमित शर्मा, सौदी एक्झिम बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नईफ अल शम्मारी, भारतीय दूतावास यांच्यावतीने मिशन आणि मनुस्मृती – समुपदेशकचे उपप्रमुख अबू माथेन जॉर्ज आदी मान्यवर उपस्थित होते. मेट्रो 3 मार्गिका ही मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका आहे. 33.5 किमी लांबीच्या या मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा लवकरच वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. तेव्हा या मार्गिकेवरून प्रवास करताना प्रवाशांना अखंडित मोबाईल सेवा मिळावी यासाठी एमएमआरसीने एसीईएस इंडिया कंपनीशी करार केला आहे. हा करार 12 वर्षांसाठी करण्यात आला आहे. या करारामुळे 4जी आणि 5जी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेट्रो3 द्वारे प्रवास करणार्‍या प्रवाशांना त्यांच्या 33.5 कि.मी. लांबीच्या प्रवासादरम्यान संपूर्ण 27 स्थानकांवर, फलाटावर, भुयारांमध्ये अतिजलद तसेच अखंडीत मोबाईल सेवा प्राप्त होणार आहे.

COMMENTS