गुन्ह्यातील जप्त किमती मुद्देमाल ठेवणार बँक लॉकरमध्ये…; जिल्हा पोलिसांचा विचार सुरु, नियमावली केली जाणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुन्ह्यातील जप्त किमती मुद्देमाल ठेवणार बँक लॉकरमध्ये…; जिल्हा पोलिसांचा विचार सुरु, नियमावली केली जाणार

अहमदनगर/प्रतिनिधी-चोर्‍या, दरोडे, घरफोड्यांतून चोरीस गेलेला व गुन्हेगारांना पकडल्यावर हस्तगत झालेला किमती ऐवज म्हणजे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व अन

विविधरंगी गणेशमूर्तींनी सजल्या नेवासा येथील बाजारपेठा
ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची वेळेत निर्मिती आणि साठवणूक करण्यास प्राधान्य : मुश्रीफ
पोलिसांचा आणखी एक दणका…कर्जतच्या टोळीवरही मोक्का

अहमदनगर/प्रतिनिधी-चोर्‍या, दरोडे, घरफोड्यांतून चोरीस गेलेला व गुन्हेगारांना पकडल्यावर हस्तगत झालेला किमती ऐवज म्हणजे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व अन्य मुद्देमाल सुरक्षेसाठी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याचा विचार जिल्हा पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नुकतेच तसे सुतोवाच केले व बँकेच्या लॉकरमध्ये मुद्देमाल ठेवण्याच्यादृष्टीने आवश्यक नियमावली तयार केली जात असल्याचेही सांगितले. जिल्हाभरामध्ये विविध चोर्‍या, दरोडे, घरफोड्यांचे गुन्हे घडतात. गुन्हे घडल्यानंतर अनेक ठिकाणी किमती दागिने स्वरुपातील मुद्देमाल अथवा रोख रक्कम चोरीला जाते. त्यानंतर त्याचा तपास पोलिस करीत असतात. या गुन्ह्यांतील एखादा आरोपी वा टोळी पकडल्यानंतर त्या आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला जातो. तो हस्तगत मुद्देमाल प्रत्येक पोलिस ठाण्यातील संबंधित मुद्देमाल कारकून यांच्या ताब्यात असतो. त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने अथवा रोख रक्कम किंवा इतर किमती वस्तु सुद्धा असतात. गुन्ह्यामध्ये हस्तगत केलेला अथवा पकडलेल्या गुन्हेगारांकडून हस्तगत केलेला ऐवज न्यायालयीन प्रक्रियेनंतर संबंधितांना दिला जातो. पण तोपर्यंत तो पोलिस कस्टडीमध्ये सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असते. यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने बँकेच्या लॉकरच्या पर्यायाचा विचार सुरू केला आहे. याबाबत सर्व प्रशासकीय बाबींचा विचार करून लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले की, जिल्ह्यामध्ये पोलिस उपविभागीय अधिकारीपदाच्या स्तरावर बँकेत लॉकर घेऊन तेथे मुद्देमाल ठेवता येईल का, या दृष्टिकोनातून विचारविनिमय सुरू करण्यात आलेला आहे. प्राथमिक स्तरावरून त्याची माहिती देण्यात आलेली आहे व त्यात येणार्‍या अडचणी वा अन्य मुद्यांचा विचार करण्यास सांगण्यात आले आहे. हा मुद्देमाल ठेवताना स्थानिक पातळीवर कोणत्या बँकेमध्ये ठेवला जावा, अथवा त्या-त्या तालुक्याचा मुद्देमाल एकत्र कशा पद्धतीने ठेवता येईल यासाठी नियमावली तयार केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्या घटनेतून मिळाला धडा
नगरमधील एका पोलिस ठाण्यातील पोलिस असलेल्या मुद्देमाल कारकूनविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला दागिने व अन्य किमती ऐवज सुरक्षेसाठी त्याच्या ताब्यात असताना त्याने तो गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यासह मागील काही दिवसात घडलेल्या काही घटनांमुळे जिल्हा पोलिसांना धडा मिळाला असून, पोलिसांची विश्‍वासार्हता जपण्यासाठी गुन्ह्यांतील जप्त किमती मुद्देमाल सुरक्षित कसा राहील, याबाबत आता जिल्हा पोलिसांनी गांभीर्याने विचार सुरू केला आहे. पोलिस ठाण्यांतील किमती मुद्देमालाच्या सुरक्षितेसाठी आता पोलिस अधीक्षकांनी लक्ष घातले आहे.

COMMENTS