Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आत्महत्या रोखण्यासाठी अनोखा उपक्रम

सहाय्यक आयुक्त सुरेखा कपिले यांच्याकडून जनजागृती

मुंबई : मुंबई शहरात दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून आत्महत्या रोखण्यासाठी मुंबई पोलिस दलातील एका महिला सहाय्यक पोलिस आयुक्तांनी अनोखा उप

उदगीर येथे बसस्थानकात प्रवाशांचे प्रचंड हाल
जीवाची पर्वा न करता पाण्यात वाहून जाणाऱ्याचे पोलिसांनी वाचवले प्राण .
शनाया फेम रसिका सुनील ने समुद्रकिनारी गुपचूप उरकला लग्नसोहळा | Filmy Masala (Video)

मुंबई : मुंबई शहरात दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून आत्महत्या रोखण्यासाठी मुंबई पोलिस दलातील एका महिला सहाय्यक पोलिस आयुक्तांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून परिसरात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. पूर्व उपनगरातील भांडुप, कांजूरमार्ग आणि विक्रोळी परिसरात या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून भविष्यात संपूर्ण मुंबईत आशा प्रकारे जनजागृती मोहीम राबविण्याचा विचार आहे.
मानसिकदृष्ट्या खच्चीकरण, कौटुंबिक वाद अथवा बेताची आर्थिक परिस्थिती आदी विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षात आत्महत्या करणार्‍यांची संख्या वाढत आहे. आत्महत्या करणार्‍यांमध्ये महिला आणि पुरुषांबरोबरच लहान मुलांची संख्या मोठी असून दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. भांडुप विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्त सुरेखा कपिले यांच्या कार्यक्षेत्रात काही महिन्यांपासून आत्महत्या करणार्‍यांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले. क्षुल्लक कारणांवरून आत्महत्या करण्यात येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आत्महत्या रोखण्यासाठी परिसरात जनजागृती अभियान राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कपिले यांनी काही सामाजिक संस्थांच्या मदतीने विक्रोळी, भांडुप आणि कांजूरमार्ग परिसरात ‘जागर’ अभियानाअंतर्गत जनजागृती मोहीम हाती घेतली. या मोहिमेत पोलीस आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते चौक सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. मानसिक तणावाखाली असलेल्या व्यक्तीचे तज्ज्ञ समुपदेशकांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरात पूर्व उपनगरातील विविध भागांत अनेक चौक सभा घेण्यात आल्या आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून भविष्यात संपूर्ण मुंबईत हा उपक्रम राबवून मानसिकदृष्ट्या खचलेल्या नागरिकांना नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुरेखा कपिले यांनी सांगितले. एखाद्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाने अथवा महिलेने आत्महत्या केल्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या कुटुंबातील व्यक्तींशी तात्काळ संपर्क साधून तज्ञ डॉक्टर, तसेच समुपदेशकांमार्फत समुपदेशन करण्यात येत आहे. या अभियानात मोठमोठ्या रुग्णालयातील डॉक्टर मोफत सेवा देत असल्याचे कपिल यांनी सांगितले.

COMMENTS