कल्याण प्रतिनिधी - डोंबिवली जवळील खंबाळपाड्यातून १० लाख रुपये किंमतीचा घातक रसायनांचा साठा पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण

कल्याण प्रतिनिधी – डोंबिवली जवळील खंबाळपाड्यातून १० लाख रुपये किंमतीचा घातक रसायनांचा साठा पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात घातक रसायनांचा साठा करणारे आणि हे रसायन खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत टँकर चालकासह स्थानिक केमिकल माफियाला ताब्यात घेतला आहे, तर या गोरख धंद्यातील बड्या बदमाशांचा शोध पोलीस घेत आहे. तर यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गणेश सोनवणे व मुशरब खान असे या आरोपीची नावे असून या पैकी एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे
COMMENTS