Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोह्यातील ग्लोबल मध्ये रंगला सप्तरंग सोहळा

चिमुकल्यांच्या कलाविष्कारांनी मान्यवरांसह प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

लोहा प्रतिनिधी - शहरातील ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये यावर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्या अंतर्गत सप्तरंग 2023 हा शाळेतील चिमुकल्यांचा विविध कला

चेअरमनपदी पाटील, उपाध्यक्षपदी प्रशांत सोळंके बिनविरोध
हिंगोलीत भगरीमुळे 100 जणांना विषबाधा
सरपंच सौ. रेशमा गंभीरे महात्मा फुले समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

लोहा प्रतिनिधी – शहरातील ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये यावर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्या अंतर्गत सप्तरंग 2023 हा शाळेतील चिमुकल्यांचा विविध कलागुण दर्शनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात रंगला.. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी पालक, मान्यवर व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
शहरातील ग्लोबल इंग्रजी शाळेच्या प्रांगणात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षाप्रमाने संस्थेच्या वतीने नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक गुलाबराव मोटे पाटील होते. सप्तरंग कार्यक्रमाचे उद्घाटन लोहा पालिकेचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संतोष तांबे, माजी नगराध्यक्ष कल्याण सूर्यवंशी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, सेवानिवृत्त वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख  प्रा. डॉ. संतुक वडजे, सेवानिवृत्त प्राचार्य ययाती घोरबांड, ग्लोबलचे सचिव संजय मोटे पाटील आदींची उपस्थिती होती. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक विविध कलाविष्कारांचे उत्कृष्ठ सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी गणेश वंदना गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. यात हिंदी, मराठी गीत तसेच लावणी, कोळी नृत्य, लोकगीत, समाजप्रबोधन गीत, देशभक्ती गीत आदींसह मुकुंदा-मुकुंदा, सामी, नगाडा आदी गीतांवर चिमुकल्यांनी ठेका धरला. चिमुकल्यांच्या कलाविष्कारांनी पालक, मान्यवर व उपस्थित प्रेक्षकांना जवळपास तीन तासांहून अधिक काळ खुर्चीवर खिळवून ठेवले. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ग्लोबल शाळेने पालकांसाठी नृत्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक मोटे यांनी केले. सूत्रसंचालन दांगटे तर आभार विनोद लोढा यांनी मानले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मनोज कुमार सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी शाळा प्रशासनाने यंदा पहिल्यांदाच उत्कृष्ठ आधुनिक साधन साहित्यांची सुसज्ज यंत्रणा उभी केली होती.

COMMENTS