Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.संदीप क्षीरसागरांचा शहरवासीयांना दिलासा !

वादळी- वार्यामुळे होत असलेली विजेची समस्या सोडविण्यासाठी दिले निर्देश

बीड प्रतिनिधी - शहरातील चांदणी चौक, कुरेशी मोहल्ला, पेठ बीड, कंकालेश्वर मंदिर परिसर, जी एन फंक्शन हॉल परिसर, मोहम्मदीया कॉलनी तसेच मोमीनपुरा आदी

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व जाती धर्मासाठी शिक्षणाची दारे खुली केली – आ.संदीप क्षीरसागर
गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या
शेतकर्‍यांवर खोडसाळपणाने अन्याय करू नये-आ.संदीप क्षीरसागर

बीड प्रतिनिधी – शहरातील चांदणी चौक, कुरेशी मोहल्ला, पेठ बीड, कंकालेश्वर मंदिर परिसर, जी एन फंक्शन हॉल परिसर, मोहम्मदीया कॉलनी तसेच मोमीनपुरा आदी भागातील नागरिकांना सातत्याने विजेची समस्या निर्माण होत आहे. या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी बुधवार (दि.14) रोजी महावितरणच्या अधिकार्‍यांना सोबत घेऊन या भागाची पाहणी केली व यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
पावसाळा सुरू होत असून जोरदार वादळी-वारा सुटत आहे. त्यामुळे वीज वितरण व्यवस्था विस्कळीत होत आहे. शहरातील चांदणी चौक, कुरेशी मोहल्ला, पेठ बीड, कंकालेश्वर मंदिर परिसर, जी एन फंक्शन हॉल परिसर, मोहम्मदीया कॉलनी, मोमीनपुरा यांसह विविध भागांमध्ये वादळी-वार्यामुळे वीजेची समस्या सातत्याने निर्माण होत आहे. विजेअभावी या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आ.संदीप क्षीरसागर यांनी बुधवार (दि14) रोजी महावितरणच्या अधिकार्‍यांना सोबत घेऊन याभागात पाहणी केली. यावर तात्काळ उपाय करून होत असलेली जिवीत व इतर प्रकारची हानी टाळण्यासाठी तत्पर व्हा.नागरिकांना होत असलेली गैरसोय दूर करा. तसेच नवीन डी.पी. बसविण्याचे काम तात्काळ सुरू करा. अशा सुचना यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी महावितरणच्या संबंधित अधिकार्‍यांना केल्या आहेत. दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी याभागातील  अंतर्गत रस्त्यांची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
प्रत्यक्ष कामाला झाली सुरूवात
आ.संदीप क्षीरसागर यांनी अधिकार्यांना सुचना केल्या नंतर थोडा वेळातच महावितरण यंत्रणा उपलब्ध झाली व प्रत्यक्ष कामाला  सुरुवात झाली. आ.संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकाराने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS