Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऐन सणासुदीत साखर महागणार

मुंबई प्रतिनिधी - आता नागरिकांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. पण ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्य नागरिकांचा चहा 'कडू' होण्याची शक्यता आहे. टॉमेटो

सिव्हील जळीतकांडाचा अहवाल तयार…हलगर्जीपणाचा ठपका?
कॅडबरी चॉकलेटमध्ये आढळली अळी
बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक LokNews24

मुंबई प्रतिनिधी – आता नागरिकांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. पण ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्य नागरिकांचा चहा ‘कडू’ होण्याची शक्यता आहे. टॉमेटोचे दर महागल्यानंतर आता साखर आपला रंग दाखवणार आहे. लवकरच साखर देखील महागणार असून सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. सणासुदीच्या काळात साखर महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्पादनात घट झाल्यानं साखरेचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. कमी उत्पादन झाल्यामुळे गेल्या महिनाभरात साखरेच्या एक्स-मिल भावात प्रति क्विंटल सुमारे 150 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान साखरेची किरकोळ किंमत काही काळासाठी 42 रुपये प्रति किलोच्या आसपास राहील असे सांगण्यात येत आहे. रविवारी साखर कारखानदारांना उत्तर प्रदेशात साखरेचा दर 3590 ते 370 रुपये प्रति क्विंटल, महाराष्ट्रात 3320 ते 3360 रुपये प्रति क्विंटल, कर्नाटकात 3295 ते 3345 रुपये प्रति क्विंटल आणि  गुजरातमध्ये 3340 ते 3510 रुपये प्रतिक्विंटल इतका होता. मार्च 2023 च्या सुरुवातीला तुलनेत हे भाव 150 ते 200 रुपये प्रति क्विंटल वाढले आहेत.

COMMENTS