Homeताज्या बातम्यादेश

चक्क टोमॅटोच्या गोदामावर दरोडा

लखनौ/वृत्तसंस्था ः महाराष्ट्रासह देशभरात टोमॅटोचे दर दीडशेच्या पार पोहचले आहेत. तर अनेकांनी आपल्या जेवणातून टोमॅटोला हद्दपार केले आहे. उत्तर भारत

बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी एकास 20 वर्षाची सक्त मजूरी
ऐसाम शिलेदारची बास्केटबॉल तपश्‍चर्या कौतुकास्पद – पो.नि. डोईफोडे
शाहीर एकनाथ सरोदे यांना राष्ट्रीय साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार

लखनौ/वृत्तसंस्था ः महाराष्ट्रासह देशभरात टोमॅटोचे दर दीडशेच्या पार पोहचले आहेत. तर अनेकांनी आपल्या जेवणातून टोमॅटोला हद्दपार केले आहे. उत्तर भारतातील काही मार्केटमध्ये तर टोमॅटोला 200 ते 250 रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे आता टोमॅटो महाग झाल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अनेक लोकांनी स्वयंपाकघरात टोमॅटो खाणेच बंद केले आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोचा तुटवडा निर्माण झालेला असतानाच आता चोरट्यांनी टोमॅटोच्या गोदामावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात चोरट्यांनी टोमॅटोचे अनेक कॅरेट चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील हरदोई येथील मार्केटमध्ये मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने व्यापार्‍यांचे गोदाम लुटले आहे. चोरट्यांनी गोदामातून 25 किलो टोमॅटो, इलेक्ट्रॉनिक काटा आणि बटाट्याचे एक पोते लंपास केले आहे. याशिवाय आरोपींनी गोदामातून महागडे साहित्यही चोरल्याची माहिती आहे. त्यानंतर आता या घटनेची माहिती समजताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून गोदाम परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासले जात असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशातील भोपाळच्या मार्केटमध्ये टोमॅटोचे शेकडो कॅरेट चोरी झाल्याची घटना समोर आली होती.

COMMENTS