Homeताज्या बातम्यासंपादकीय

नस दाबणारा प्रतिनिधी आणि जागलेला महात्मा!

 " या माणसाणं देशाचं वाटोळं केलं" असं ट्विट महाराष्ट्रातीर एक लोक प्रतिनिधीने करताच एक चमत्कार महाराष्ट्राने पाहिला, तो म्हणजे  झोपी गेलेला जागा

महाराष्ट्राचे पहिले गैर काॅंग्रेसी मुख्यमंत्री !
……. तर, दर पाचमधील एक माणूस धोक्यात !
कंत्राटी पोलीस भरती आणि परिणाम! 

 ” या माणसाणं देशाचं वाटोळं केलं” असं ट्विट महाराष्ट्रातीर एक लोक प्रतिनिधीने करताच एक चमत्कार महाराष्ट्राने पाहिला, तो म्हणजे  झोपी गेलेला जागा झाला! गेली काही वर्षे देशात आणि राज्यात महागाई, बेरोजगारी , सामाजिक अत्याचार अशा कित्तेक प्रकारच्या घटना घडत असताना एखाद्या सामाजिक पातळीवर लोकप्रिय असणाऱ्या नेत्याने किंवा व्यक्तिने जन आंदोलन करावं, अशी देशवासियांची भावना आहे. देशवासियांच्या या भावनांची कदर नसलेला माणूस या देशाचा गांधी होऊ शकतो का? हा खरा प्रश्न! गांधी म्हणजे जनभावना, गांधी म्हणजे प्रत्येक प्रश्ना भिडणारा, गांधी म्हणजे स्वयं प्रकाशित, विचार आणि भूमिका त्याबरहुकूम कृतीशीलता ही गांधी नावाच्या महात्माचे सार आहे. यातील कोणत्याही बाबीचे  साम्य नसलेले किंबहुना व्यक्तिमत्त्वातील ही वैशिष्ट्येच ज्यांच्या व्यक्तिमत्वात नाही, त्यांनी कोणत्याही जन आंदोलनाची हौस करणं म्हणजे “कपाळावर गुलाल आणि डोक्याला खवले”, असा प्रकार होतो. माझ्या आंदोलनामुळे देशवासीयांना फायदा झाला असं महात्मा कधी म्हणत नसतात. आपले कर्तव्य ते करित राहतात. परंतु, माझ्या कार्यामुळे तुमचा हा फायदा झाला, अशी उपकारांची भाषा महात्मा बोलत नसतात. महात्मा असण्याची उपरती झालेल्यांना मात्र वरवर असे भास होत राहतात. याउलट, यांच्या तथाकथित आंदोलनातून जी काही उपज झाली ती आता भारतीयांच्या उरावर बसली आहे. आज माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जांना सरकार दरबारी कचऱ्याची टोपली नशिबी आली आहे. कधीकाळी, याची दहशत आणि जरब प्रशासनात होती. कित्येकांनी राजीनामे देऊन घरचा रस्ता धरला तर, काहींनी अशा अर्ज करणाऱ्यांनाच सुपाऱ्या देऊन आडवे पाडले. पण, अशा कोणत्याच क्षणी आधुनिक स्वयं घोषित महात्मा बोलले नाही. कुंभकर्णाला जागविण्यासाठी नगारे वाजवले जायचे. पण, आता थाळ्या आणि टाळ्या वाजवल्या जातात. कुठे नगारा आणि कुठे थाळ्या! कशाचा कशाशी मेळ नाही. गेली ९ वर्षं आधुनिक महात्माला देश शोधत राहीला! अगदी सर्फ च्या जाहीरातीला लाजविणाऱ्या “ढुंढते रह जाओगे” सारखं देश शोधत राहीला. पण आधुनिक महात्मा काही गवसेचना! अगदी ‘नगरी नगरी, द्वारे द्वारे ढुंढोरे सांवरिया!” मंदिर, गुहा, असा सर्वत्र शक्यता असणाऱ्या स्थळांना चाचपडले. काश! की कोई मिल गया होता! असं म्हणायची पाळी आली. मात्र, महात्मा काही गवसले नाहीत. अखेर, एक लोकांचा प्रतिनीधी असा गवसला की, त्याने म्हणे महात्माची नस पकडली. महात्माची नस म्हणे प्रत्यक्षात दाबण्याची गरज नाही!  त्या लोकप्रतिनीला म्हणे तंत्रज्ञान पावलं आहे ! तंत्रज्ञानावर आधारित समाजाचे म्हणवल्या जाणाऱ्या एका माध्यमावर म्हणे त्यांनी महात्माची नस दाबली – त्यासाठी केवळ शब्द वापरले! कोणतीही रिध्दिसिध्दी नाही म्हणे! फक्त शब्दांचीच रिध्दिसिध्दी! “या माणसाने देशाचं वाटोळं केलं”, एवढाच तो मंत्र! पण, किती जहाल मात्रा लागली म्हणून काय सांगावं! आधुनिक महात्मा थेट महाझोपेत असताना दचकून उठले! म्हणाले, खबरदार! ‘ मी, कोर्टात जाईन!” काय आश्चर्य! गेली ९ वर्षे झोपेत असलेले किंवा तसं सोंग घेतलेले महात्मा आता जंतरमंतर करतील! रामलिला देखील त्यांना आता नकाशावर सापडेल! खरेतर, मला महात्माच्या या करामती पेक्षाही त्या लोकप्रतिनिधीचे कौतुक वाटते की, त्या प्रतिनिधीने नस दाबण्याचे प्रशिक्षण नेमके कुठे घेतले, याचे आम्हाला कुतुहल आहे!

COMMENTS