पुणे प्रतिनिधी - सिंहगड रोडवरील नवले हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या एका अविवाहित तरुणीने टॉयलेटमध्ये जाऊन एका मुलीला जन्म दिला. धक्कादाय

पुणे प्रतिनिधी – सिंहगड रोडवरील नवले हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या एका अविवाहित तरुणीने टॉयलेटमध्ये जाऊन एका मुलीला जन्म दिला. धक्कादायक बाब म्हणजे तिने त्या नवजात अर्भकाला बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. त्यात त्या अर्भकाचा मृत्यू झाला. हा प्रकार नऱ्हे येथील एका हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. याप्रकरणी नंदा ढवळे (वय ६२, रा. बाणेर) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS