Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये विहीरचे खोदकाम करताना 3 जणांचा मृत्यू

नाशिक प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीचे खोदकाम करताना बार उडवण्यात आला. यावेळी

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक
Beed : वीरशैव समाजाचा आधारवड कोसळला
छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या स्कूल बसला आग

नाशिक प्रतिनिधी – नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीचे खोदकाम करताना बार उडवण्यात आला. यावेळी तिनही कामगार विहिरीत असल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावात ही घटना घडली आहे. या गावात ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोदकाम सुरू असून या ठिकाणी काही परप्रांतीय कामगार काम करत आहेत. अशातच काल रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. विहिरीत काम करत असताना बार लावण्यात आला होता. मात्र याचवेळी कामगार देखील काम करत होते. अचानक बार उडाला. यामध्ये तीन कामगार विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून त्यानंतर लागलीच रोहिले प्राथमिक उपचार केंद्रातून रुग्णवाहिका बोलावण्यात आली. जखमींना नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर सद्यस्थितीत नाशिक ग्रामीण पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल असून प्राथमिक तपास सुरू आहे.स्फोटकांचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडली. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS