Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिर्‍हाड पदयात्रेच्या इशार्‍याने भटक्यांच्या मदारी वसाहतीच्या कामाला सुरुवात

अँड अरूण जाधव यांच्या परिश्रमाला यश

जामखेड/प्रतिनिधी ः तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून  मंजूर झालेले घरांचे  बांधकाम तात्काळ सुरू न झाल्

तळेगाव-मळेला नागरीकांची केली कोरोना तपासणी
सावेडीत सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत सृष्टी, संस्कृती, सिद्धी, रिद्धी व संस्कार यांचा गौरव

जामखेड/प्रतिनिधी ः तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून  मंजूर झालेले घरांचे  बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यास खर्डा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बिर्‍हाड पदयात्रा काढण्याचा इशारा मिळताच ,सदरील जागेवर तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत भुमिपुजनाचा नारळ फोडण्यात आला.
        अनेक वेळा आंदोलने केली. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी खोटी आश्‍वासने मिळाली. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. राजकीय पुढार्‍यांच्या श्रेयवादातून या मदारी बांधवांना कित्येक वर्षापासून पालात राहावे लागले. या महालात राहणार्‍यांना. पालात राहणार्‍यांची वेदना काय माहित ? असे अ‍ॅड.अरुण जाधव म्हणाले . त्यांनी बिर्‍हाड पदयात्रेचा निवेदन देऊन इशारा दिला होता. या निवेदनाचा विचार करून अ‍ॅड.अरुण जाधव यांच्या बिर्‍हाड पदयात्रेच्या इशार्‍याने दि.26ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की,खर्डा येथील मदारी वसाहतीसाठी गट.नं.1141 मधील एक हेक्टर जागा आहे. ती जागा यशवंतराव चव्हाण वसाहती अंतर्गत या मदारी वसाहतीसाठी शासनाने मंजूर केली आहे. त्या अनुषंगाने ही जागा आज मोजणी करून त्याची सपाटीकरण करत आहे. लवकर लेआउट मंजूर झाला आहे. लेआउट मंजूर करून त्याचप्रमाणे प्रत्येक प्लॉटची मोजणी करून त्याचा ताबा मदारी बांधवांना दिला जाणार आहे. येथील जागेचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी गेली कित्येक वर्षापासून कार्यकर्त्यांना घेऊन भटक्याचे नेते अ‍ॅड.अरुण जाधव लढत आहे. त्यांचे मला कौतुक वाटते.

COMMENTS