Homeताज्या बातम्यासंपादकीय

पोटनिवडणुकीचा घोळ

पुण्यात कसबा पेठ मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर दोन जागा रिक्त झाल्या असून, या जागेव

महाविकास आघाडीतील वितंडवाद
नितीश कुमारांचे राजकीय भवितव्य
सत्ता सपंत्तीचा मोह…

पुण्यात कसबा पेठ मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर दोन जागा रिक्त झाल्या असून, या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक विशेष कारणाने गाजते आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यमान आमदार किंवा खासदाराचे निधन झाल्यास त्या जागेवर तिथल्या विरोधकांनी उमेवार द्यायचे नाही, ती जागा बिनविरोध करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून तयार होत आहे. मात्र या पंरपरेला अपवाद देखील आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहे. कसब्यातून काँगे्रसने आपला तर, चिंचवडमधून राष्ट्रवादीने आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. या निवडणुकीतील ट्विस्ट म्हणजे कसब्याची निवडणूक. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात उमेदवारी द्यावी, असा प्रवाह होता. खुद्द मुक्ताताईंचे पती शैलेश टिळक मैदानात उतरण्यासाठी इच्छूक होते. मात्र भाजपने टिळक कुटुंबियांना उमेदवारी टाळली. त्यामुळे काँगे्रसच्या हाती आयते कोलीत आले. उमेदवा जर टिळक कुटुंबियांपैकी असता तर, निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार केला असता. त्यातच भाजपने ब्राम्हण समाजावर अन्याय केल्याची भावना पुण्यातील ब्राम्हण समाजात पसरत असल्यामुळे हिंदू महासंघाचे नेते आनंंद दवे निवडणूक मैदानात उतरत आहेत. त्यामुळ ब्राम्हण समाजाच्या मतांचे धूव्रीकरण होण्याचा धोका संभवतो आहे. त्यातच या निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने उडी घेतली आहे. त्यामुळे मतांचे धुव्रीकरण झाल्यास भाजपला मोठा फटका येथे बसू शकतो. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः या निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्र काढत सर्वपक्षीयांना ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, नाना पटोले यांना फोन करून, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र तरी देखील काँगे्रस ही निवडणूक लढण्यासाठी पावले टाकली आहेत. विधानपरिषदेच्या दोन जागा जिंकल्यानंतर काँगे्रसचा आत्मविश्‍वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे कसब्यातील जागा जिंकून काँगे्रस पुन्हा एकदा आपला गमावलेला आत्मविश्‍वास परत आणू इच्छित आहे. पुण्यातील कसबा मतदार संघाची उमेदवारी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. त्यामुळे काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात थेट लढत होणार आहे. काँग्रेसकडून प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, धंगेकर आणि रोहित टिळक यांची नावे चर्चेत होती. मात्र काँग्रेसने धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.  उमेदवारी जाहीर होताच आज सकाळी धंगेकर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यामुळे नाराज टिळक कुटुंबियांचा अप्रत्यक्षपणे पाठिंबा मागण्याच हा प्रकार दिसून येत आहे. मतांचे धुव्रीकरण झाल्यास भाजपला ही जागा लढणे जड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्यास भाजपचा फायदाच आहे. जर भाजपचा पराभव झाला तर, विधानपरिषदेपाठोपाठ पुण्यातील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागू शकतो, आणि त्यातून भाजपचा आत्मविश्‍वास डळमळीत होऊ शकतो. भाजपची पुण्यातील जबाबादारी चंद्रकांतदादा पाटलांकडे असल्यामुळे चंद्रकांत दादा काय निर्णय घेतात, या निवडणुकीसाठी कोणती रणनिती ठरवतात, हे आगामी काळात स्पष्ट होईलच. 

COMMENTS