Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषीकन्यांनी आहेर वडगांव येथील शेतकर्‍यांना दिली बोर्डो पेस्ट बद्दल  माहिती बीड -वसंतराव नाईक

बीड प्रतिनिधी - मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत  आदित्य शिक्षण संस्थेच्या,  जि. बीड  आदित्य कृषि महाविद्यालयाच्या कृषिकन्या कु. प्रिती कानवडे,निकी

शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख लंपास
सोनगाव परिसरात बिबट्याची दहशत सुरू; वनखात्याचे मात्र दुर्लक्ष
म.ज्यो.फुले महाविद्यालयात रक्तदान शिबीर

बीड प्रतिनिधी – मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत  आदित्य शिक्षण संस्थेच्या,  जि. बीड  आदित्य कृषि महाविद्यालयाच्या कृषिकन्या कु. प्रिती कानवडे,निकीता भोसले, वैष्णवी मुळे,साक्षी डाखोरे , कोमल लोखंडे,मृणाली चौधरी,मेघा देवढे,गौरी मोटे,यांचे ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि औद्योगिक कार्यक्रम 2023-24 अंतर्गत कृषीकन्यांनी बोर्डो पेस्ट बद्दल गावातील शेतकरी वर्गाला सविस्तर माहिती दिली.
 बोर्डो पेस्ट तयार करताना कळीचा चुना दगडरहित असावा, मिश्रण करताना धातूच्या भांड्याचा वापर करू नये, फवारणी होईपर्यंत प्लॅस्टिक ड्रममध्ये मिश्रण करावे, क्षारयुक्त पाणी वापरू नये, जर बोर्डो पेस्ट केलेली असेल तर ती जमिनीपासून 1.5- 2 फूट खोडाला वर लावावी आणि बुरशी व खोड रोग नियंत्रण संबंधी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.सर्वत्र अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळबागांवर पडलेल्या बुरशीजन्य रोगांवर एक प्रभावी उपाय म्हणून बोर्डो मिश्रणाचा उपयोग केला जात आहे. याबद्दल शेतकर्‍यांना सविस्तर माहिती दिली.कृषीकन्यांना रोगनिदान विभागाचे विषयतज्ञ डॉ.ए.एच.केंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले . तसेच या अभ्यास दौर्‍यास विद्यार्थ्यांनीना आदित्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आदितीजी सारडा मॅडम  ,आदित्य कृषी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य  डॉ. तुकाराम तांबे , प्राचार्य श्री.शाम भूतडा ,कार्यक्रम समन्वयक डॉ.संदीप मोरे ,कार्यक्रम अधिकारी व विषयतज्ञ आणि महाविद्यालयाचा इतर प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS