Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यसनातून पिढी बरबाद होऊ नये – सुषमा अंधारे 

नाशिक प्रतिनिधी - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या यांची मनमाड येथील जाहीर सभा आटोपल्या नंतर दुसऱ्या दिवशी सोमवार दि. ११ डिसेंम्बर

सुषमा अंधारे आमदार शिरसाटांवर ठोकणार तीन रूपयांचा दावा
संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी थंड का पडली? 
सुषमा अंधारेंची 40 भावांना राखी बांधण्याची इच्छा

नाशिक प्रतिनिधी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या यांची मनमाड येथील जाहीर सभा आटोपल्या नंतर दुसऱ्या दिवशी सोमवार दि. ११ डिसेंम्बर रोजी नाशिक येथील शिवसेना भवन येथे पत्रकारांशी संवाद साधत ललित पाटील ड्रग्स प्रकारणातील विषय मांडत आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पस्ट केली. नाशिक मधून जन्माला आलेले ड्रग्स प्रकरण हे भारतातील कानाकोपऱ्यात पसरल्याने सर्व नागरिक अजूनही आपल्या पाल्याप्रती धास्तावलेला असल्याने काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहेत. मात्र असे न होता सर्वच उलटसुलट चर्चा होऊन विषय लांबविला जात असल्याने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्यावर मी नाराज असल्याचे खंत अंधारे यांनी व्यक्त केली आहेत. 

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असून नाशिक मधल्या महत्वाच्या विषयावर सरकार गंभीर नाहीत. मात्र अजूनही काही व्हाईट कॉलर , व्यावसायिक , गुंडे , मवाली त्या प्रकरणात असण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे गप्प का ? यावर नाशिकचे पालकमंत्री व राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांचा खरपूस समाचार आज अंधारे यांनी पत्रकार परिषदेत घेतला. 

नाशिकचे पत्रकार सुजान –  ललित पाटील प्रकरणाचे रहस्य अजून ही गुलदस्त्यात असल्याने काही पत्रकार बांधव यांनी प्रश्न विचारताच अंधारे यांनी पत्रकारांचे मनभरून कौतुक करत ” नाशिकचे पत्रकार हुशार , संयमी , वा सर्व प्रकारच्या माहिती आपणाकडे असतात मात्र मी गृहमंत्री असते तर निर्णय घेऊन मोकळी झाले असते. 

बढे भाभीचे नाव नुसते चर्चेत नाव कुणीही घेत नाहीत ! 

छोटी भाभी उर्फ नुश्रीम शेख , चिपड्या उर्फ इरफान शेख ,

बडी भाभी यांचे नाव नुसते चर्चेत आहेत मात्र अंधारे यांनी कुठल्याही प्रकारे दस्त ऐवज हातात नसल्याने मी अगोदर कायद्याची विध्यार्थी असल्याने मला ती चौकट मोडता येणार नाहीत. मात्र सभ्र का फल मिठा होता है. असे सांगून सध्या तरी अंधारे यांनी पत्रकारांना बगल दिली असली तरी नेक्स्ट टाईम ते बढे भाभीचे नाव जाहीर करणार असल्याचे स्पस्ट संकेत दिले आहेत.

सुषमा अंधारे यांनी नाशिक दौऱ्यावर येऊन ललित पाटील प्रकरण कायद्याच्या चौकटीत बसवले खरे मात्र येणारा काळ हा सध्याचे खासदार हेमंत गोडसे व पालक मंत्री दादा भुसे यांना अडचणीचे तर ठरणार नाहीना ? असे विविध प्रश्न त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उजेडात आल्याने नाशिक करांना देखील या प्रकरणात पुढे काय ? असा ट्विस्ट शिवसेना – ठाकरे गट शिंदे गटाला देतांना दिसतोय. 

COMMENTS